मुंबई - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, डोंबिवलीच्या नवरा-बायकोचा जागेवर मृत्यू; क्षणात संसार उद्धवस्त
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Thane Accident : दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनील घरत, प्रतिनिधी
ठाणे : शहापूर तालुक्यातील कलमगाव जवळ मुंबई-नाशिक महामार्गावर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डोंबिवली येथील रोहन दत्तात्रय लुगडे ( 32 वर्षे) आणि त्यांची पत्नी अवंतिका रोहन लुगडे वय (28 वर्षे) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी शहापूर तालुक्यातील कळमगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर प्रवास करणारे कल्याण-डोंबिवली येथील रहिवासी रोहन लुगडे व अवंतिका रोहन लुगडे हे पती-पत्नी यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोघेही रस्त्यावर पडलेले असल्याचे स्थानिकांनी पाहिले.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव
advertisement
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. तसेच शहापूर पोलिस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, निष्काळजीपणा की इतर काही कारण होते याचा तपास शहापूर पोलीस करत आहेत.
advertisement
मुंबई–गोवा महामार्गावर अपघात, ट्रक पलटी
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणे नाका परिसरात जगबुडी नदी शेजारी वाशिष्टी डेअरी समोर आज अपघाताची घटना घडली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला आयशर ट्रक वाशिष्टी डेअरी समोरील डायव्हर्शनजवळ अचानक समोर आलेल्या रिक्षामुळे चालकाने तात्काळ ब्रेक लावले. यामुळे ट्रकचे संतुलन बिघडून तो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सध्या या लेनवरून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महामार्ग विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आयशर ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
मुंबई - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, डोंबिवलीच्या नवरा-बायकोचा जागेवर मृत्यू; क्षणात संसार उद्धवस्त









