Crime News : 'हिस्सा दे नाहीतर…' मुलाच्या धमकीनंतर वडिलांसोबत जे घडलं ते पाहून उल्हासनगर हादरलं; नेमकं काय घडलं?

Last Updated:

Ulhasnagar Crime News: मुलाने मालमत्तेचा हिस्सा मागत उल्हानगरमध्ये राहत असलेल्या वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

News18
News18
उल्हासनगर : पैशाच्या हव्यासासाठी माणूस किती खालच्या थरला जाऊ शकतो याचा थरकाप उडवणारा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. मालमत्तेतील हिस्सा मिळावा म्हणून स्पेनमध्ये राहणाऱ्या मुलाने आपल्या 80 वर्षीय वडिलांना निर्दयपणे मारहाण केली आहे. या घटनेची तक्रार विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये राहणारे हरी मेघराज नागदेव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना मुलांकडून आधार आणि आपुलकीची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनी सर्वजण हादरवून गेले आहे. नागदेव यांचा मुलगा राम नागदेव हा गेली अनेक वर्षे स्पेनमधील शहरात वास्तव्यास आहे.
मात्र 2 ऑक्टोबर रोजी तो अचानक उल्हासनगरमधील त्याच्या वडिलांकडे आला आणि येताच त्यांनी वडिलांकडे मालमत्तेतील हिस्सा देण्याचा दबाव टाकू लागला.पण वडिलांनी त्याला वेळ देण्यास सांगितले त्यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि त्याने वडिलांना मारहाण केली.
advertisement
या घटनेनंतर नागदेव कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. विठ्ठलवाडी पोलिसांनी राम नागदेव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : 'हिस्सा दे नाहीतर…' मुलाच्या धमकीनंतर वडिलांसोबत जे घडलं ते पाहून उल्हासनगर हादरलं; नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement