advertisement

Pune Accident Rada : पुण्यातील मध्यवर्ती भागात मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा, भरधाव वेगाने अनेक गाड्यांना धडक, पाहा Video

Last Updated:

Pune Accident Rada : "मी पोलिसाचा मुलगा आहे" असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. सुदैवाने या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.

Pune Accident Rada young boy driving at high speed
Pune Accident Rada young boy driving at high speed
Pune Crime News : पुण्यातील मध्यवर्ती भागात रात्रीच्या वेळी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावरील गोंधळ आणि स्थानिकांशी झालेली बाचाबाची यामुळे बराच वेळ राडा सुरू राहिला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नारायण पेठ परिसरात एका मद्यधुंद तरुणाने काही गाड्यांना धडक दिल्याचं समोर आलंय.

मी पोलिसाचा मुलगा आहे

प्रत्यक्ष घटनेनुसार, नारायण पेठ परिसरात एका मद्यधुंद तरुणाने आणि तरुणीने भरधाव वेगाने वाहन चालवत रस्त्यावरील उभ्या असलेल्या काही गाड्यांना धडका दिल्या. यानंतर स्थानिक नागरिक जाब विचारण्यासाठी गेले असता, त्या तरुणाने "मी पोलिसाचा मुलगा आहे" असे म्हणत आरडाओरडा सुरू केला. सुदैवाने या ॲक्सिडेंटमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु स्थानिकांच्या गाड्यांचे नुकसान झाले असून तरुणाच्या अरेरावीमुळे वाद विकोपाला गेला होता.
advertisement

पाहा Video

दोन्ही बाजूंची तक्रार दाखल

advertisement
दरम्यान, हा सर्व प्रकार विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नारायण पेठेत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident Rada : पुण्यातील मध्यवर्ती भागात मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा, भरधाव वेगाने अनेक गाड्यांना धडक, पाहा Video
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement