Gold Loan Update: 88,500 रुपयांवर सोनं, गोल्ड लोन घ्यावं का? किती बसेल इंटरेस्ट रेट?

Last Updated:

सोनं तारण कर्ज घेण्याचा विचार करताय? एचडीएफसी, इंडियन बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा, पंजाब नॅशनल, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक, आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस बँक विविध व्याज दरांवर कर्ज देतात.

सोने बातम्या
सोने बातम्या
तुम्ही पण घरखरेदी करण्याच्या विचारात आहात का? आणि पैशांची तजवीज करण्यासाठी गोल्ड लोन म्हणजेच सोनं तारण कर्ज घेण्याच्या विचारांत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सोनं किंवा सोन्याचे दागिने कोणत्याही बँकेत तारण ठेवून गोल्ड लोन घेता येतं. यासाठी खूप कागदपत्रंही द्यावी लागत नाही. नंतर हप्ते भरून आपलं सोनं सोडवून घ्यायचं. या कर्जावर बँक व्याज आकारते. सध्या देशात10 ग्रॅम सोन्याची किंमत 88,000 रुपयांच्या वर गेली आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत आता तुम्हाला गहण किंवा तारण ठेवलेल्या सोन्यावर अधिक कर्ज मिळू शकतं. तुम्ही 5 लाख रुपयांचं गोल्ड लोन घेतलंत तर तुम्हाला किती रुपयांचा EMI पडेल याबाबत इथं माहिती दिली आहे.
एचडीएफसी बँक
खासगी क्षेत्रातली एचडीएफसी बँक दोन वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोन वर 8.5 टक्के व्याज दर आकारत आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला 22,568 रुपयांचा हप्ता पडेल.
इंडियन बँक
इंडियन बँक दोन वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर 8.65 टक्के व्याज घेत आहे. त्यामुळे तुम्हाला दरमहा 22,599 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.
advertisement
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया सगळ्यात स्वस्त गोल्ड लोन देत आहे. दोन वर्षांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर 8.7 टक्के व्याज दर आकारत आहे. त्यामुळे ईएमआय 22,610 रुपये असेल.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया दोन वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर 8.8 टक्के व्याज घेत आहे. ईएमआय 22,631 रुपयांचा पडेल.
advertisement
कॅनरा आणि पंजाब नॅशनल बँक
कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या दोन्ही बँका दोन वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या गोल्ड लोनवर 9.25 टक्के व्याज दर आकारत आहेत. त्यासाठी EMI 22,725 रुपये भरावा लागेल.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा दोन वर्षांसाठी गोल्डवर 5 लाख लाख रुपये लोन देण्यासाठी 9.4 टक्के व्याज आकारत आहे. बँकेमध्ये तुम्हाला दरमहा 22,756 रुपये हप्ता भरावा लागेल.
advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया
भारतीय स्टेट बँक दोन वर्षांसाठी गोल्ड लोन वर 5 लाख रुपयांसाठी 9.6 टक्के व्याज घेत आहे. त्यासाठी तुम्हाला दरमहा 22,798 रुपये हप्ता भरावा लागेल.
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँक दोन वर्षांसाठी 5 लाख रुपये गोल्ड लोनसाठी10 टक्के व्याज आकारेल. तुम्ही इथून कर्ज घेतलं तर तुम्हाला 22,882 रुपये ईएमआय पडेल.
advertisement
अ‍ॅक्सिस बँक
अ‍ॅक्सिस बँक दोन वर्षांसाठी सोन्यावर 5 लाख रुपये कर्ज देण्यासाठी 17 टक्के व्याज आकारत आहे. कर्जदाराला ईएमआय 24,376 रुपये भरावा लागेल.
तुम्हाला योग्य वाटेल त्या बँकेतून तुम्ही गोल्ड लोन घेऊन आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता.
मराठी बातम्या/Utility/
Gold Loan Update: 88,500 रुपयांवर सोनं, गोल्ड लोन घ्यावं का? किती बसेल इंटरेस्ट रेट?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement