VIDEO | कोल्हापुरातील नाट्यगृहाला नेमकी आग कशी लागली? धक्कादायक कारण समोर

Last Updated : कोल्हापूर
ज्ञानेश्वर साळोखे : कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह अक्षरशः जळून खाक झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री ९.३० वाजता शॉर्ट सर्किट झालं आणि त्यातून आग लागली. केशराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग कुस्ती मैदानाच्या बाजूने लागली होती. ज्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज व्यासपीठावर बसून कुस्ती पाहायचे ते व्यासपीठ आता पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी आल्याने कोसळले आहे. तर नाट्यगृहाचे सुद्धा मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
VIDEO | कोल्हापुरातील नाट्यगृहाला नेमकी आग कशी लागली? धक्कादायक कारण समोर
advertisement
advertisement
advertisement