पुणे: ज्या वयात मुलांना नीट हाताने जेवण सुद्धा करता येत नाही, त्या वयात पुण्यातील अवघ्या दीड वर्षांच्या नील निखिल भालेराव या चिमुकल्याने केलेल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नीलने केवळ 2 मिनिटे 53 सेकंदात जगातील 45 कार ब्रँडची अचूक ओळख सांगून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपली नोंद केली आहे. एवढ्या कमी वयात साध्य केलेल्या या उल्लेखनीय यशामुळे नीलवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीलच्या पालकांनी या रेकॉर्डविषयी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 01, 2025, 15:59 IST