बँकेच्या अधिकाऱ्यामुळे वाचले 111 कोटी, PWD च्या खात्यातून फसवणुकीचा डाव, चेकवर लिहिलेल्या एका शब्दाने फुटलं भांडं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या अधिकाऱ्याच्या 'अलर्टनेस'मुळे (Alertness) एक मोठा घोटाळा उघडकीस आला. या घटनेत नेमकं काय घडलं आणि एका साध्या चुकीमुळे कसा मोठा डाव उधळला गेला, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
मुंबई : बँक अधिकारी म्हणजे केवळ कागदपत्रे तपासणारी व्यक्ती नाही, तर अनेकदा ते नागरिकांच्या आणि सरकारी तिजोरीतील पैशांचे संरक्षकही ठरतात. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका सतर्क अधिकाऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) 111 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे फसवणुकीपासून वाचले आहेत. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि नक्की असं काय घडलं असेल अशा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.
या अधिकाऱ्याच्या 'अलर्टनेस'मुळे (Alertness) एक मोठा घोटाळा उघडकीस आला. या घटनेत नेमकं काय घडलं आणि एका साध्या चुकीमुळे कसा मोठा डाव उधळला गेला, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
'मिलियन' आणि 'बिलियन'ने वाढवला संशय
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत 7 नोव्हेंबर रोजी एक चेक जमा करण्यात आला होता. एका स्थानिक ठेकेदाराने 'डिमांड ड्राफ्ट' (DD) बनवण्यासाठी हा चेक बँकेत जमा केला.
advertisement
हा चेक 'ओवी कन्स्ट्रक्शन्स' नावाच्या फर्मच्या बाजूने 111 कोटी 63 लाख रुपये इतक्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट जारी करण्यासाठी देण्यात आला होता. हे पैसे PWD च्या त्या सरकारी खात्यातून काढले जाणार होते, ज्यात सरकारी निविदांसाठी (Tenders) ठेकेदारांकडून 'अर्नेस्ट मनी डिपॉझिट' (Earnest Money Deposit) जमा केली जाते. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांसाठी हे काही नवीन नव्हतं. पण चेक वर लिहिलेली गोष्ट मात्र नवीन होती.
advertisement
चेकवरील रक्कम शब्दात लिहिताना 'मिलियन' (Million) आणि 'बिलियन' (Billion) या शब्दांचा वापर केलेला होता. भारतीय बँकिंग सिस्टीममध्ये सरकारी खात्यांच्या व्यवहारांमध्ये हे शब्द वापरणे अत्यंत असामान्य (Unusual) आहे. कारण अशा पद्धतीचा व्यवहार सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत नाही, असे शब्द वापरले जात नाही, हे बँकेच्या लक्षात आलं.
बँक अधिकाऱ्याने जेव्हा एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पाहिला आणि त्यावर 'मिलियन', 'बिलियन' हे शब्द वाचले, तेव्हा त्यांना लगेच संशय आला. ही रक्कम खूप मोठी असल्याने आणि चेकवर लिहिलेले शब्द नियमांपेक्षा वेगळे असल्याने, अधिकाऱ्याने कोणताही विलंब न करता PWD विभागाशी संपर्क साधला.
advertisement
तपासणी केली असता, PWD च्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. कारण हा चेक संपूर्णपणे बनावट (Fake) असल्याचे उघड झाले. या फसवणुकीचा पर्दाफाश होताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी ठेकेदार आणि जव्हार नगर पंचायतीचे अध्यक्ष नीलेश उर्फ पिंका पडवाले आणि PWD चा कंत्राटी कर्मचारी (Contract Employee) यद्नेश अंबिरे यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितले की, एवढी मोठी रक्कम काढण्यासाठी PWD चे वरिष्ठ अधिकारी स्वतः बँकेत येतात, पण हा चेक एका तिसऱ्या व्यक्तीच्या हातून पाठवण्यात आला होता, ज्यामुळे बँक अधिकाऱ्याचा संशय आणखी बळावला होता.
advertisement
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, PWD ने देखील आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, कारण या कर्मचाऱ्यानेच ठेकेदाराला PWD च्या खात्याची आतील गोपनीय माहिती पुरवली असावी. पोलीस या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचाही कसून तपास करत आहेत. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत (Police Remand) पाठवण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बँकेच्या अधिकाऱ्यामुळे वाचले 111 कोटी, PWD च्या खात्यातून फसवणुकीचा डाव, चेकवर लिहिलेल्या एका शब्दाने फुटलं भांडं


