Breaking News: पाकिस्तानमध्ये हिंदू मंत्र्यावर हल्ला; आर्मी चीफ मुनीरने भडकवले अन् 4 दिवसात झाला हल्ला

Last Updated:

Kheal Das Attack: पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांच्या विधानानंतर हिंदू मंत्री कील दास कोहिस्तानी यांच्या ताफ्यावर हल्ला; पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी निषेध केला.

News18
News18
इस्लामाबाद: पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांनी चार दिवसांपूर्वी परदेशातील पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, आपल्या भावी पिढ्यांना ही कथा सांगावी लागेल की आपल्या पूर्वजांना असे का वाटले की आपण हिंदूंहून प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत. आपण धर्म, प्रथा, परंपरा, विचार आणि महत्त्वाकांक्षा... या सर्वांमध्ये हिंदूंहून वेगळे आहोत.
मुनीर यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया आली होती आणि यामुळे हिंदूंवर हल्ले वाढण्याची भीती व्यक्त केली गेली होती. आता चार दिवसही उलटले नाहीत. तोच त्यांची भीती खरी ठरली आहे. रविवारी पाकिस्तानचे हिंदू मंत्री कील दास कोहिस्तानी यांच्या ताफ्यावर काही लोकांनी हल्ला केला.ज्यात ते थोडक्यात बचावले.
कधी झाला हल्ला?
शहबाज शरीफ यांच्या सरकारमधील धार्मिक राज्यमंत्री कील दास कोहिस्तानी शनिवारी थट्टा जिल्ह्यातून जात असताना आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यावर टोमॅटो आणि बटाटे फेकले. सरकार ग्रीन पाकिस्तान मोहिमेअंतर्गत चोलोचिस्तान सिंध आणि पंजाब प्रांतात 6 कालवे बनवणार आहे. ज्याला मोठा विरोध होत आहे.
advertisement
लोकांचे म्हणणे आहे की, यामुळे या भागात पाण्याची समस्या अधिक गंभीर होईल. कारण हा भाग आधीच पाणीटंचाईचा सामना करत आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कोहिस्तानी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले. ते म्हणाले की लोकप्रतिनिधींवर हल्ला अस्वीकार्य आहे आणि घटनेत सामील असलेल्या लोकांना कठोर शिक्षा दिली जाईल.
advertisement
कोण आहेत कोहिस्तानी?
कोहिस्तानी सिंधच्या जामशोरो जिल्ह्यातील आहेत. ते पहिल्यांदा 2018 मध्ये पीएमएल-एनच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 2024 मध्ये ते पुन्हा निवडून आले आणि त्यांना राज्यमंत्री बनवण्यात आले. त्यांना हिंदूंचे नेते मानले जाते आणि पीएमएल-एन त्यांच्याच भरोशावर हिंदूंची मते मिळवत आली आहे.
सोशल मीडियावर संताप
हिंदू मंत्र्यांवरील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर #HinduMinisterAttack आणि #KhealDasAttack हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. एका यूजरने लिहिले की, पाकिस्तानमध्ये हिंदू मंत्र्यावर हल्ला करणे लाजीरवाणे आहे! अल्पसंख्यांकांची सुरक्षा कुठे आहे?"
advertisement
@PakVoice4Justice अकाउंटवरून ट्विट करण्यात आले की, "आंदोलकांचा राग नहर प्रकल्पांविरुद्ध होता. पण मंत्र्यावर हल्ला करणे चुकीचे आहे. याची चौकशी झाली पाहिजे." आणखी एका यूजरने लिहिले की, "कील दास कोहिस्तानी यांच्यावर हल्ला अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराचा पुरावा आहे. यूएनने यात लक्ष घातले पाहिजे!"
अन्य एकाने लिहिले - "टोमॅटो-बटाट्याने हल्ला? पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या सुरक्षेची नवीन व्याख्या!" हल्ला करणाऱ्या गटा @SindhNationalist ने स्पष्टीकरण देताना लिहिले की, "आम्ही नहर प्रकल्पांचा विरोध करत होतो. पण हिंसा चुकीची होती. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात."
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Breaking News: पाकिस्तानमध्ये हिंदू मंत्र्यावर हल्ला; आर्मी चीफ मुनीरने भडकवले अन् 4 दिवसात झाला हल्ला
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement