"म्हारी छोरीया छोरो से कम है के", माजलगावच्या जुळ्या बहिणींचा दुबईत विक्रम; भारतासाठी अभिमानाचा क्षण

Last Updated:

दुबई येथे पार पडलेल्या 14 व्या सांस्कृतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत या दोघींनी दुबईकरांची मने जिंकली आहेत. खरंतर आई-वडिलांनी माजलगावकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण भारत वाशियांसाठीही अभिमानास्पद बाब आहे. की स्वरा आणि रागिनी या दोघींनी परदेशात जाऊन स्पर्धा जिंकली आणि भारतीयांचं मनोबल उंचावलं आहे.

+
बीडच्या

बीडच्या जुळ्या बहिणींनी जिंकली दुबईकरांची माने

प्रशांत पवार - प्रतिनिधी, बीड : आजवर कलेने अनेकांना यशस्वी होण्यासाठी नवी दिशा दिली आहे. विशेषतः लहान वयातच मुलींनी आपल्या कलेच्या जोरावर नावलौकिक मिळवल्याचे उदाहरण कौतुकास्पद ठरते. "म्हारी छोरीया छोरो से कम है के" हा प्रसिद्ध डायलॉग वास्तवात उतरवला आहे बीड जिल्ह्यातील माजलगावच्या स्वरा आणि रागिनी या जुळ्या बहिणींनी. केवळ 9 वर्षांच्या या दोघींनी आपल्या नृत्यकलेच्या जोरावर साता समुद्रापलीकडे दुबईपर्यंत पोहोचून आपली छाप पाडली आहे.
दुबईत आयोजित 14 व्या सांस्कृतिक ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी भारतीयांच्या मानाचा तुरा रोवला. या विजयामुळे त्यांच्या आई-वडिलांबरोबरच संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. स्वरा आणि रागिनीच्या कलेचं श्रेय त्यांच्या आई-वडिलांना आणि शिक्षिका वैभवी यांना जातं. मागील दोन वर्षांत वैभवी यांनी या दोघींना वेगवेगळ्या प्रकारच्या लावणी व नृत्यशैलींमध्ये प्रवीण बनवलं.
advertisement
स्वरा आणि रागिनीच्या यशाने त्यांच्या आई-वडिलांना अनपेक्षित आनंद दिला आहे. आई आरती आणि वडील संतोष ललवाणी यांनी आपल्या मुलींना नेहमीच मुलासमान वागणूक दिली. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देत वेळोवेळी पाठीशी उभे राहिले. त्यांच्या परदेशातील विजयाने महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
स्वरा आणि रागिनी या चिमुकल्या मुलींनी जे साध्य करून दाखवलं ते पाहून त्यांची आई आरती आणि वडील संतोष ललवाणी यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, त्यामुळे आता त्यांच्या मुलींचं हे यश पाहून त्यांना आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
"म्हारी छोरीया छोरो से कम है के", माजलगावच्या जुळ्या बहिणींचा दुबईत विक्रम; भारतासाठी अभिमानाचा क्षण
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement