Covid EG.5.1 : सावधान! कोरोना परत आलाय, 'या' देशात नव्या व्हेरियंटने वृद्धांना केलं टार्गेट? भारताला आहे का धोका?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
Covid EG.5.1 : रुग्णांमध्ये विशेषत: वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. नियमितपणे हात धुण्यानं तुमचं कोविड 19 आणि इतर विषाणूंपासून संरक्षण होतं.
नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : कोरोना महामारीमुळे जगभरात हाहाकार माजला होता. कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. या महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच ब्रिटनमधून एक चिंताजनक बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं होतं. या लॉकडाउनचा फटका जवळपास सर्वच क्षेत्रांना बसला होता. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना रोजगार गेल्यानं शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर करावं लागलं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच ब्रिटनमधून एक चिंताजनक बातमी आलीय.येथे गेल्या महिन्यापासून कोविड ईजी 5.1 या नवीन व्हेरियंटचे रुग्ण सापडत असून हा व्हायरल ब्रिटनमध्ये वेगानं पसरतोय. इंग्लंडमधील आरोग्य अधिकार्यांच्या म्हणण्यानुसारहा व्हेरियंट ओमिक्रॉनमधून आलाय,व त्याला ईजी 5.1एरिसअसं नाव देण्यात आलंय, याबद्दल ‘अमर उजाला’ने वृत्त दिलंय.
advertisement
वृद्धांमध्ये प्रमाण जास्त
याबाबत यूकेएचएसएच्या लसीकरण प्रमुख डॉ. मेरी रॅमसे यांनी सांगितलं की,‘आम्हाला या आठवड्यात नोंदवलेल्या कोविड 19 प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्याचं निर्देशनास आलंय. रुग्णांमध्ये विशेषत: वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. नियमितपणे हात धुण्यानं तुमचं कोविड 19 आणि इतर विषाणूंपासून संरक्षण होतं. तुम्हाला श्वसनाच्या आजाराची लक्षणे आढळल्यास शक्य तितकं इतरांपासून दूर राहा,’असा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement
लसीकरणाचा झाला फायदा
आंतरराष्ट्रीय स्तरावर,विशेषत: आशियामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ब्रिटनमध्ये ईजी 5.1 या नवीन व्हेरियंटची प्रसार झाल्याची नोंद झाल्यानंतर 31 जुलै2023रोजी तो कोविडचा एक नवीन व्हेरियंट म्हणून नोंदवला गेलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं दोन आठवड्यांपूर्वी ईजी 5.1 व्हेरियंटची माहिती घेणं सुरू केलंय. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस म्हणाले की,‘कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानं नागरिक अधिक संरक्षित झालेत,परंतु या व्हायरसबाबत सतर्कता घेण्यामध्ये कोणतेही कमी ठेवू नका.’
advertisement
नवीन व्हेरियंट किती धोकादायक?
view commentsकोरोनाचा हा नवीव व्हेरियंट अधिक गंभीर असल्याबाबत अद्याप कोणतेही संकेत मिळाले नाहीत. तसेच यूकेएचएसएच्या आकडेवारीनुसार या नवीन व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण ब्रिटनमधील एकूण कोविड रुग्णांपैकी 14.6 टक्के आहे. यूकेएचएसएच्या'रेस्पिरेटरी डेटामार्ट सिस्टम'द्वारे नोंदवलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4 टक्के नमुने कोविड-19 बाधित आढळले आहेत. दरम्यान,भारतामध्ये कोरोनाची साथ जवळपास संपुष्टात आली असली तरी भविष्यात काळजी घेण्याची गरज आहे.
Location :
Delhi
First Published :
August 05, 2023 7:41 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Covid EG.5.1 : सावधान! कोरोना परत आलाय, 'या' देशात नव्या व्हेरियंटने वृद्धांना केलं टार्गेट? भारताला आहे का धोका?


