Iran War: ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं! अमेरिकेच्या घातक विमानांना 'या' देशात नो-एन्ट्री, इराणविरोधातील युद्धात नवा ट्विस्ट
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran US War: इराण-अमेरिका युद्धाच्या १६ व्या दिवशी स्वित्झर्लंडने अमेरिकन लष्करी विमानांना आपली हवाई हद्द वापरण्यास मनाई केली आहे. २००० हून अधिक मृत्यू आणि तेल संकटामुळे तणाव वाढला असताना..
Iran US Conflict: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेले यु्द्ध आणखीच तीव्र होत आहे. इराण युद्धाचा आज १६ दिवस असून दोन्ही बाजूने ड्रोन, क्षेपणास्त्रे हल्ले तीव्र होत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जलवाहतूक सुरू करण्यासाठी अमेरिकेकडून इतर देशांना इराणविरोधात आवाहन केले जात असताना मोठी घडामोड झाली आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानांना हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय स्वित्झर्लंडने घेतला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, स्वित्झर्लंड सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपल्या ऐतिहासिक 'तटस्थ' (Neutral) धोरणाचा पुनरुच्चार करत, स्वित्झर्लंडने अमेरिकन लष्करी विमानांना आपल्या हवाई हद्दीतून (Airspace) उड्डाण करण्यास मनाई केली आहे.
लष्करी विमानांना परवानगी नाकारली
शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी स्वित्झर्लंड सरकारने अधिकृत निवेदन जारी केले. यानुसार, १५ मार्च रोजी अमेरिकेची दोन रिकॉनिसेंस (Reconnaissance - टेहळणी) विमाने स्विस हवाई हद्दीतून जाणार होती, परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. "ही विमाने थेट इराणसोबतच्या युद्धाशी संबंधित मोहिमेवर असल्याने आम्ही त्यांना परवानगी देऊ शकत नाही," असे स्पष्टीकरण स्विस फेडरल कौन्सिलने दिले आहे.
advertisement
Today the Swiss government discussed military overflight requests from the US. Citing the law of neutrality, the Federal Council rejected two requests made in connection with the war in Iran. It decided to permit three flights. Details in DE/FR/IT: https://t.co/Dps46MlpBG
— Swiss Federal Government (@SwissGov) March 14, 2026
advertisement
मात्र, स्वित्झर्लंडने स्पष्ट केले आहे की, मानवतावादी दृष्टिकोनातून किंवा वैद्यकीय मदतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांवर कोणतीही बंदी नसेल. जखमींना नेणारी किंवा मदतकार्याशी संबंधित उड्डाणे स्विस हवाई हद्दीचा वापर करू शकतील. याच धोरणांतर्गत, १५ मार्च रोजी दोन ट्रान्सपोर्ट विमाने आणि १७ मार्च रोजी एका मेंटेनन्स विमानाला उड्डाणाची मुभा देण्यात आली आहे.
advertisement
तिसऱ्या आठवड्यातही युद्ध सुरू, मृतांचा आकडा २००० पार
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेले हे युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचले आहे. या भीषण संघर्षात आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला असून, यात इराणमधील नागरिकांची संख्या मोठी आहे.
तेल पुरवठ्यावर संकट
या युद्धामुळे जगाचा तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाती देशांतून तेल आयात करणाऱ्या राष्ट्रांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी स्वतःची नौदल पथके तैनात करावीत. इराणने खार्ग बेटावरील हल्ल्यानंतर दिलेल्या प्रतिशोधाच्या धमकीमुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' परिसरातील तणाव शिगेला पोहोचला आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 15, 2026 9:25 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं! अमेरिकेच्या घातक विमानांना 'या' देशात नो-एन्ट्री, इराणविरोधातील युद्धात नवा ट्विस्ट










