Israel Pager Attack : हिजबुल्लाहसाठी घातक ठरलेला पेजर बॉम्ब कसा तयार झाला? जाणून घ्या इस्रायलचा जुगाड

Last Updated:

एवढ्या छोट्या दिसणाऱ्या पेजरचं वॉकिंग बॉम्बमध्ये कसं रूपांतर केलं? हा सर्वांना प्रश्न पडला होता. 'रॉयटर्स' या न्यूज एजन्सीने याबाबत एक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे.

Israel Attacks Hezbollah pager attack
Israel Attacks Hezbollah pager attack
नवी दिल्ली: गेल्या महिन्यात इस्रायलने हिजबुल्लाहवर पेजर हल्ला करून सर्वांना चकित केलं होतं. इस्रायलने एवढ्या छोट्या दिसणाऱ्या पेजरचं वॉकिंग बॉम्बमध्ये कसं रूपांतर केलं? हा सर्वांना प्रश्न पडला होता. 'रॉयटर्स' या न्यूज एजन्सीने याबाबत एक महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. लेबनीज सोर्सचा हवाला देत रॉयटर्सने, पेजरचं बॉम्बमध्ये रूपांतर करण्याच्या इस्रायली तंत्रज्ञानाबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण दिलं आहे.
पेजर बनवणाऱ्या एजंट्सनी एका बॅटरीची रचना केली होती. या बॅटरीमध्ये प्लॅस्टिकच्या स्फोटकांचा एक छोटा पण शक्तिशाली चार्ज आणि एक नवीन डिटोनेटर लपवला होता. जो दिसत नव्हता. पेजर बॉम्बची गुप्त रचना आणि बॅटरीचं काळजीपूर्वक तयार केलेलं कव्हर या दोन्ही गोष्टी रॉयटर्सच्या बातमीत तपशीलवार समजावून सांगितल्या आहेत.
हे संपूर्ण ऑपरेशन अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर पूर्ण झालं. त्यात सहा ग्रॅम व्हाईट पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट (पीईटीएन) प्लॅस्टिक स्फोटक वापरण्यात आलं होतं. त्यासोबत एक पातळ चौकोनी पत्रा वापरण्यात आला होता. दोघांच्या वायर्सना एकत्रित पीळ देण्यात आला होता.
advertisement
बॅटरी सेलमधील उर्वरित जागा अत्यंत ज्वलनशील सामग्रीच्या पट्टीने व्यापलेली होती. ही पट्टी डिटोनेटर म्हणून काम करते. संपूर्ण प्रक्रियेचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये दिसत असल्यानुसार, तीन-लेअर सँडविच एका काळ्या प्लॅस्टिकच्या स्लीव्हमध्ये बसवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यावर काडीपेटीच्या आकाराचं धातूचं आवरण लावण्यात आलं होतं. दोन बॉम्ब तज्ज्ञांनी रॉयटर्सला सांगितलं की, असेंब्ली असामान्य होती कारण ती स्टँडर्ड लहान डिटोनेटरवर किंवा नेहमीच्या धातूच्या सिलिंडरवर अवलंबून नव्हती.
advertisement

35 ग्रॅमची बॅटरी बनली बॉम्ब

फेब्रुवारीमध्ये पेजर आढळल्यानंतर इस्रायलने स्फोटकांच्या उपस्थितीची तपासणी केली होती. ते अलार्म ट्रिगर करतात की नाही हे पाहण्यासाठी त्यांना विमानतळावरील सुरक्षा स्कॅनरद्वारे तपासण्यात आलं होतं. या स्कॅनरमधून पेजर बेमालूमपणे बाहेर पडले होते. दोन बॉम्बतज्ज्ञांनी सांगितलं की, उपकरणे बॅटरी पॅकच्या आत एक स्पार्क निर्माण करण्यासाठी सेट केली गेली होती. जे स्फोटक पदार्थ प्रज्वलित करण्यासाठी आणि PETN च्या शीटला स्फोटासाठी ट्रिगर करण्यासाठी पुरेसं होतं. स्फोटक पदार्थ आणि त्याच्या आवरणाने एकूण पॅकचा एक तृतीयांश भाग व्यापला होता. त्यामुळे बॅटरी पॅकमध्ये 35 ग्रॅम वजनाचं स्फोटक होतं.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Pager Attack : हिजबुल्लाहसाठी घातक ठरलेला पेजर बॉम्ब कसा तयार झाला? जाणून घ्या इस्रायलचा जुगाड
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement