PM मोदींनी दिलेल्या त्या हिऱ्याची किंमत होती इतके लाख; भारताच्या पंतप्रधानांनी दिलेले गिफ्ट पाहा कुठे ठेवले?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
PM Narendra Modi Gift Jill Biden: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि त्यांच्या कुटुंबाला 2023 मध्ये परदेशी नेत्यांकडून लाखो डॉलर्सच्या भेटवस्तू मिळाल्या. यातील सर्वात मौल्यवान भेट ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बिडेन यांची पत्नी बिडेन यांना दिलेला २० हजार अमेरिकन डॉलर्सचा हिऱ्याचा समावेश होता.
नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी २०१४ साली पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर सातत्याने जगभरातील अनेक देशांसोबत संबंध वाढवले. मोदींच्या या दौऱ्यांमुळे भारताचे अनेक देशांसोबतचे संबंध जवळचे झाले. आज देखील जगभरात असे अनेक नेते आहेत ज्यांच्यासोबत मोदींचे खुप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याचा फायदा भारताला त्या देशासोबतचे विषय हाताळताना होतो. अशी मैत्री ही अनेकदा राजकारणाच्या पेक्षा जास्त जवळची असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेव्हा जेव्हा जगभरातील मोठे नेते भेटायला येतात तेव्हा ते त्यांना भेटवस्तू देतात. मोदींकडून दिली जाणारी ही खास भेट सर्वच नेत्यांना त्यांच्या जवळ आणते. मोदींच्या या भेट वस्तू देण्याच्या सवयीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
याचे कारण म्हणजे मोदींनी 2023 साली जिल बिडेन यांना पंतप्रधान मोदींनी जी भेटवस्तू दिली होती ती विदेशी नेत्यांकडून जील यांना मिळालेली सर्वात महागडी भेट होती.
advertisement
रोहित शर्माचे कसोटी करिअर संपले; एक नव्हे तिघांनी दिला दुजोरा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांच्या कुटुंबाला 2023 मध्ये परदेशी नेत्यांकडून लाखो डॉलर्सच्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. त्यापैकी सर्वात मौल्यवान भेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल बिडेन यांना दिलेला अंदाजे 17 लाख 15 हजार 440 रुपयांचा (20 हजार अमेरिकन डॉलर) हिरा होय. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार पंतप्रधान मोदींनी दिलेला 7.5 कॅरेटचा हिरा 2023 मध्ये राष्ट्रपतींच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मिळालेली सर्वात महागडी भेट आहे.
advertisement
बिडेन कुटुंबाला 14 हजार 063 किमतीचा 'ब्रोच' आणि 4 हजार 510 किमतीचा 'ब्रेसलेट', युक्रेनच्या राजदूताकडून आणि इजिप्तच्या फर्स्ट लेडीकडून मिळाला. मंत्रालयाच्या दस्तऐवजानुसार,पंतप्रधान मोदींनी भेट दिलेला 20 हजार किमतीचा हिरा व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये ठेवण्यात आला आहे तर राष्ट्रपती आणि फर्स्ट लेडी यांना मिळालेल्या इतर भेटवस्तू संग्रहात पाठवण्यात आल्या आहेत.
advertisement
राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनाही अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. यामध्ये दक्षिण कोरियाचे सध्या राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी 7 हजार 100 अमेरिकी डॉलर किमतीचा फोटो अल्बम, मंगोलियन पंतप्रधान यांनी 3 हजार 495 अमेरिकन डॉलर किमतीचा मंगोल योद्धांचा पुतळा, ब्रुनेईच्या सुलतानाकडून 3 हजार 300 अमेरिकन डॉलर किमतीचा चांदीचा वाडगा, इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांकडून 3 हजार 160 अमेरिकी डॉलरचा चांदीचा ट्रे आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिलेल्या 2 हजार 400 कोलाज या गोष्टींचा समावेश आहे.
advertisement
फेडरल कायद्यानुसार कार्यकारी शाखेच्या अधिकाऱ्यांनी परदेशी नेते आणि समकक्षांकडून मिळालेल्या भेटवस्तू घोषित करणे आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 4:51 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
PM मोदींनी दिलेल्या त्या हिऱ्याची किंमत होती इतके लाख; भारताच्या पंतप्रधानांनी दिलेले गिफ्ट पाहा कुठे ठेवले?


