Donald Trump: बाहेर निघा, ट्रम्प यांचा नवा फतवा; 9 लाख स्थलांतरितांना देश सोडण्याचा आदेश
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
ट्रम्प प्रशासनाने बायडेन सरकारच्या CBP One अॅप धोरणावर घणाघात करत अमेरिका दाखल झालेल्या 9 लाखांहून अधिक प्रवाशांचे परवाने रद्द केले आहेत. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने स्पष्ट केलंय की या नागरिकांनी आता स्वतःहून देश सोडावा.
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या सुमारे 9 लाख स्थलांतरितांना मोठा धक्का दिला आहे. हे स्थलांतरित माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात आणलेल्या CBP One ॲप धोरणाद्वारे अमेरिकेत आले होते. ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांचे धोरण बदलून या स्थलांतरितांचे अमेरिकेत राहण्याचे कायदेशीर परवाने रद्द केले आहेत. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (DHS) ने सोमवारी यासंबंधी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की CBP One ॲपद्वारे आलेल्या स्थलांतरितांनी त्वरित देश सोडावा.
जानेवारी 2023 पासून बायडेन प्रशासनाच्या या ॲप धोरणाअंतर्गत 9 लाखांहून अधिक स्थलांतरित अमेरिकेत आले. या कार्यक्रमात त्यांना दोन वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळाली होती. DHS ने म्हटले आहे की त्यांनी हे परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे या स्थलांतरितांनी स्वतःहून अमेरिका सोडावी. सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशाची सुरक्षा अधिक चांगली करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे DHS चे म्हणणे आहे.
advertisement
स्थलांतरितांना पाठवले जात आहेत ईमेल
असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, ईमेलद्वारे लोकांना अमेरिका सोडण्यास सांगितले जात आहे. अल ओट्रो लाडो या कायदेशीर मदत गटाने सांगितले की ज्या लोकांना हे नोटिसा मिळाल्या आहेत, त्यापैकी बहुतेक होंडुरास, अल साल्वाडोर आणि मेक्सिकोमधील आहेत. नोटिस मिळाल्यानंतर या लोकांमध्ये अस्वस्थता आहे. हे लोक त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी जानेवारीमध्ये सत्ता हाती घेतल्यानंतर ज्या धोरणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे इतर देशांच्या वस्तूंवर शुल्क वाढवणे आणि अमेरिकेतून विदेशी लोकांना बाहेर काढणे. ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांच्या काळातील अनेक धोरणे बदलली आहेत. जी अमेरिकेत विदेश्यांना मानवता यासारख्या मुद्द्यांवर आश्रय देण्याची गोष्ट करतात.
ट्रम्प प्रशासनाने क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला येथून आलेल्या 5,32,000 स्थलांतरितांच्या अमेरिकेतील आश्रय कार्यक्रमालाही 24 एप्रिलपासून समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने 11 लाख लोकांसाठी तात्पुरती संरक्षित स्थिती (Temporary Protected Status - TPS) देखील संपुष्टात आणली आहे. यामध्ये बहुतेक व्हेनेझुएला आणि हैतीमधील लोकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांविरुद्धही मोहीम चालवली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 08, 2025 10:35 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Donald Trump: बाहेर निघा, ट्रम्प यांचा नवा फतवा; 9 लाख स्थलांतरितांना देश सोडण्याचा आदेश


