अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीला दिलं असं बर्थडे गिफ्ट उडाली खळबळ, आता होणार पोलिस चौकशी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Viral News: ब्राझिलमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका क्लॉडिया रायआने शोमध्ये आपल्या मुलीला तिच्या 12व्या वाढदिवसाला सेक्स टॉय गिफ्ट दिल्याचा धक्कादायक खुलासा केला.
ब्राझिलियन अभिनेत्री क्लॉडिया रायआच्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तिने एका टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान कबूल केले की आपल्या १२ वर्षांच्या मुलीला तिने व्हायब्रेटर भेट दिला होता. या वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, तिच्या विरोधात पोलिस तपास सुरू होण्याची शक्यता आहे.
क्लॉडिया रायआ ही ब्राझिलमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका आहे. तिने Goucha या पोर्तुगीज टेलिव्हिजन शोमध्ये हा धक्कादायक खुलासा केला. मुलींनी स्वतःचा शोध घ्यावा आणि त्यांना काय आवडते ते समजून घ्यावे, यासाठी तिने हा निर्णय घेतला. मात्र, तिच्या या वक्तव्यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी तिच्या या कृतीवर कठोर टीका केली आहे. काहींनी हे मुलीच्या निरागसतेचा अपमान असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी हे पूर्णपणे अयोग्य असल्याचा आरोप केला आहे.
वाद वाढताच क्लॉडिया रायआने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे स्पष्टीकरण देत सांगितले की, तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. ती आपल्या मुलांशी कोणत्याही विषयावर खुले संवाद साधते, त्यात लैंगिक शिक्षणाचाही समावेश आहे. मात्र, प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी मूल्ये असतात आणि ती त्याचा आदर करते.
advertisement
ब्राझिलियन वृत्तसंस्था Metropoles नुसार, ख्रिस्तियानो कॅपोरेझो यांनी क्लॉडिया रायआ विरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. तिच्यावर बालक आणि किशोरवयीन कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे, कारण तिने अल्पवयीन मुलीला अयोग्य सामग्री दिल्याचा दावा केला जात आहे.
advertisement
सेक्स थेरपिस्ट तमारा झानोतेली यांनी यावर चिंता व्यक्त करत सांगितले की, जरी काही डॉक्टर सेक्स टॉयचा आरोग्यासाठी वापर करण्याची शिफारस करत असले, तरी १२ वर्षांच्या मुलीला असे गिफ्ट देणे योग्य नाही. मुलींना वयात येताना काही समज असू शकते, पण इतक्या कमी वयात अशा वस्तू देणे चुकीचे आणि त्रासदायक आहे.
या प्रकरणावर रायआच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिची मोठी मुलगी सोफिया जी आता आई आहे. तसेच मोठा मुलगा एनझो, जो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. या प्रकरणावर मौन बाळगून आहेत. याआधीही रायआ आपल्या वैयक्तिक निर्णयांमुळे चर्चेत राहिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 2:29 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीला दिलं असं बर्थडे गिफ्ट उडाली खळबळ, आता होणार पोलिस चौकशी


