आकाशाचा तो भाग, जिथून कोणतंही विमान उडत नाही, पायलटलाही घ्यावा लागतो U-Turn
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्रत्येक विमानाचं उड्डाण ठरलेल्या मार्गानेच होतं, जेणेकरून कोणतीही टक्कर किंवा अपघात होऊ नये. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात एक अशी जागा आहे, जिच्या वरून कोणतंही विमान उडत नाही?
मुंबई : आकाशात उड्डाण करणं आजच्या काळात प्रवासाचा सर्वात जलद आणि सोयीचा मार्ग बनला आहे. काही तासांत एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचणं आता स्वप्न नाही. पण जसं जमिनीवर वाहनांसाठी रस्ते आणि ट्रॅफिक सिग्नल असतात, तसंच विमानांसाठी आकाशातही ठराविक रूट्स असतात. प्रत्येक विमानाचं उड्डाण ठरलेल्या मार्गानेच होतं, जेणेकरून कोणतीही टक्कर किंवा अपघात होऊ नये. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात एक अशी जागा आहे, जिच्या वरून कोणतंही विमान उडत नाही?
ही जागा म्हणजे तिबेटियन पठार (Tibetan Plateau), ज्याला जगाचं छप्पर (Roof of the World) असंही म्हटलं जातं. मध्य आशियातील हा भाग सुमारे 2.5 दशलक्ष चौरस किलोमीटर इतका मोठा असून, समुद्रसपाटीपासून सुमारे 4,500 मीटर उंच आहे. या भौगोलिक उंचीमुळे इथून विमान उडवणं अत्यंत कठीण मानलं जातं.
इतक्या उंचावर हवेत ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्याने विमानाचे इंजिन फेल होण्याची शक्यता वाढते. त्यातच, जर काही आपत्कालीन परिस्थितीत लँडिंगची गरज पडली, तर या परिसरात सपाट जागा नसल्यामुळे ती शक्यच नाही.
advertisement
याशिवाय, तिबेटियन पठाराचं हवामानही अत्यंत अनिश्चित आणि धोकादायक आहे. अचानक वादळं, बर्फवृष्टी, जोरदार वारे आणि दाट धुके हे इथले नेहमीचे हवामान असते. विजिबिलिटी (दृश्यता) कमी असल्यामुळे उंच पर्वतरांगांवरून विमान नेणं अतिशय जोखमीचं ठरतं. त्यामुळे जगभरातील एअर ट्रॅफिक कंट्रोल या प्रदेशावरून कोणत्याही देशाच्या फ्लाइट्सना उड्डाणाची परवानगी देत नाही.
पूर्वी काही विमानं या भागातून गेली होती, पण अनेक अपघातांनंतर हा मार्ग कायमचा बंद करण्यात आला. 1992 मध्ये China Airlines Flight 358 आणि 2002 मध्ये रशियन MI-26 हेलिकॉप्टर तिबेट परिसरात कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर एव्हिएशन अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
advertisement
आजही ही जागा जगातील सर्वात रहस्यमय आणि “नो-फ्लाय झोन” म्हणून ओळखली जाते, जिथून विमानं दूरच राहतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 6:01 PM IST


