Birds Fact : माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही पडतं टक्कल? रिसर्चमधून जे समोर आलं ते ऐकून बसेल धक्का

Last Updated:

पुण्यातील काही पक्षी अभ्यासकांनी महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तीन वेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये 'टक्कल' पडल्याचे पाहिले आणि त्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद केली.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
मुंबई : वाढत्या वयानुसार माणसांना, विशेषतः पुरुषांना, टक्कल पडणे ही सामान्य गोष्ट आहे. पण तुम्ही कधी कल्पना केली आहे का की तुमच्या बाल्कनीत दिसणाऱ्या चिमण्यांना किंवा कावळ्यांनाही टक्कल पडू शकते? हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. पक्ष्यांमध्ये हा प्रकार 'पिसे गळणे' म्हणून ओळखला जातो आणि अलीकडेच भारतात झालेल्या एका महत्त्वाच्या संशोधनातून याबद्दल काही धक्कादायक निरीक्षणे समोर आली आहेत.
महाराष्ट्रातील पक्ष्यांमध्ये आढळला हा दुर्मिळ प्रकार
पुण्यातील काही पक्षी अभ्यासकांनी महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तीन वेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये 'टक्कल' पडल्याचे पाहिले आणि त्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद केली.
या पक्ष्यांमध्ये हा प्रकार आढळला
साळुंकी (Myna): एका साळुंकीच्या डोक्यावर आणि गळ्यावर पिसे नव्हती.
कोकिळ (Cuckoo): एका कोकिळच्या चोचीपासून डोळ्यांपर्यंत टक्कल पडले होते.
कावळा (Crow): एका कावळ्याचे संपूर्ण डोके आणि मान पिसेविरहीत होती.
advertisement
संशोधकांच्या मते, या पक्ष्यांमध्ये टक्कल पडल्याची ही भारतातील पहिली नोंद आहे.
टक्कल पडण्यामागची कारणं काय आहेत?
सामान्यपणे, पक्षींची वर्षातून एकदा त्यांची जुनी पिसे गळतात आणि नवीन पिसे आणतात, याला 'मॉल्टिंग' (Molting) म्हणतात आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण टक्कल पडणे ही गोष्ट 'मॉल्टिंग' नाही.
यामागे ही कारणे असू शकतात
निरीक्षणादरम्यान आढळले की, टक्कल पडलेल्या पक्ष्यांच्या उघड्या त्वचेवर बुरशीचा संसर्ग (Infection) किंवा छोटे परजीवी जंतू (Parasites) असू शकतात. हे जंतू पिसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात. पक्ष्यांमध्ये झालेले काही विशिष्ट आजार किंवा गंभीर संसर्ग त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करतात, ज्यामुळे पिसे गळू शकतात.
advertisement
जर पक्ष्यांना त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळाली नाहीत, तर त्यांच्या पिसांची वाढ थांबते किंवा ती गळू लागतात.
पर्यावरणातील बदल, मानवी वस्तीचा वाढता ताण किंवा आवाज यामुळे होणारा ताण देखील त्यांच्या शरीरावर परिणाम करू शकतो.
माणसांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये फरक काय?
माणसांमध्ये टक्कल पडणे बऱ्याचदा आनुवंशिक किंवा हार्मोनल बदलांमुळे होते. पण पक्ष्यांमध्ये टक्कल पडणे हे नैसर्गिक नव्हे, तर असामान्य मानले जाते. यातून हे सिद्ध होते की, आपल्या आसपासच्या वातावरणाचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर पक्ष्यांच्या आरोग्यावरही होत आहे.
advertisement
त्यामुळे, हा अभ्यास आपल्याला एक गंभीर इशारा देतो की, आपण पर्यावरणाची आणि पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Birds Fact : माणसांप्रमाणे पक्ष्यांनाही पडतं टक्कल? रिसर्चमधून जे समोर आलं ते ऐकून बसेल धक्का
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement