गिरीजा ओकनंतर आणखी एक निळी साडीवाली महिला तुफान VIRAL; 1 कोटी 80 लाख लोकांनी पाहिला हा VIDEO

Last Updated:

Blue Saree Woman Video Viral : निळ्या साडीमुळे इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या गिरीजा ओकबाबत अजूनही लोक सर्च करत आहेत. तोच यादरम्यान आणखी एक निळी साडीवाली महिला सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : काही दिवसांपासून अभिनेत्री गिरीजा ओक चांगलीच चर्चेत आली. तिचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि अवघ्या 24 तासांतच ती नॅशनल क्रश बनली. गिरीजा ओकबाबत अजूनही लोक सर्च करत आहेत. तोच यादरम्यान आणखी एक निळी साडीवाली महिला सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
गिरीजा ओकनंतर आणखी एका निळ्या साडीवाल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका ऑफिसमधील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता निळ्या साडीतील ही महिला तिथं येतं. तिच्या आजूबाजूला ऑफिसचे सगळे कर्मचारी उभे आहेत. गाणं वाजतं आणि महिला ठेक्यावर ताल धरते.  गायक सुखविंदर सिंग याच्या आवाजातील बन ठन चली बोलो या गाण्यावर ती थिरकताना दिसते.
advertisement
या महिलेने ऑफिसचं वातावरण काही क्षणात पूर्णपणे बदलून टाकलं. ऑफिस फ्लोअरला तिने डान्स फ्लोअरच बनवलं. तिचे एकापेक्षा एक भारी असे मुव्ह्ज पाहून ऑफिसमधीलही इतर कर्मचारीही इम्प्रेस होतात. टाळ्या वाजवून तिचं कौतुक करताना दिसतात. फक्त ऑफिसमधीलच नाही तर हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनाही या महिलेने वेड लावलं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही तिच्या या व्हिडीओला 18 मिलियन म्हणजे तब्बल 1 कोटी 8 लाख व्ह्युज मिळाले आहेत. कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सगळ्यांनी आपल्याला महिलेचा डान्स आवडल्याचं सांगितलं आहे.
advertisement
व्हिडीओ 18 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आलेला आहे. तसंच ऑफिसमध्ये सजावट केल्याचंही दिसतं आहे. म्हणजे ऑफिसमधील दिवाळीच्या कालावधीतील हा व्हिडीओ आहे.
advertisement
आता ही महिला आहे कोण? तर तशी ही सामान्य महिला. तिच्याबाबत फार माहिती नाही. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा हा ऑफिसमधील डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला. इन्स्टाग्राम पोस्टनुसार तिचं नाव शिखा शर्मा असं आहे. शर्मा जी की बेटी असं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव आहे. तिच्या अकाऊंटवर तिच्या डान्सचे असे आणखी काही व्हिडीओ आहेत.
advertisement
गिरीजा ओकनंतर ही निळी साडीवाली महिला तुम्हाला कशी वाटली, तिचा हा व्हिडीओ, डान्स तुम्हाला आवडला का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
गिरीजा ओकनंतर आणखी एक निळी साडीवाली महिला तुफान VIRAL; 1 कोटी 80 लाख लोकांनी पाहिला हा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement