advertisement

बॉयफ्रेंडला जाड मुली आवडतात, मॉडेलने करिअर सोडलं आणि केलं असं काही....

Last Updated:

प्रेमामध्ये लोक काय काय करत नाहीत. आवडत्या व्यक्तीसाठी लोक सर्वच काही त्याच्या पसंतीचं करण्याचा प्रयत्न करतात. राहणं, खाणं, पिणं, कधीतर स्वभावही बदलण्याचा प्रयत्न करतात.

बॉयफ्रेंडसाठी मॉडेलनं वाढवलं वजन
बॉयफ्रेंडसाठी मॉडेलनं वाढवलं वजन
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : प्रेमामध्ये लोक काय काय करत नाहीत. आवडत्या व्यक्तीसाठी लोक सर्वच काही त्याच्या पसंतीचं करण्याचा प्रयत्न करतात. राहणं, खाणं, पिणं, कधीतर स्वभावही बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रेमात वेडे झालेल्या लोकांच्या अनेक घटना समोर येत असतात. जे आपल्या साथीदारासाठी काहीही करतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. ज्यामध्ये एका मॉडेल तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडसाठी करिअर सोडलं. एवढ्यावरच ती थांबली नाही तिनं पुढे काय केलं हे जाणूनही तुम्ही चकित व्हाल.
बॉयफ्रेंडला जाड मुली आवडतात म्हणून एका मॉडेलनं चक्क त्याच्यासाठी वजन वाढवलं. एवढंच नाही तर त्यामुळे तिला आपलं करिअरही सोडावं लागलं. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
एका मॉडेलनं दावा केला आहे की, तिनं एका महिन्यात 35 किलो वजन वाढवलं. ती म्हटली तिनं हे फक्त प्रियकराच्या आवडीसाठी केलंय. जेव्हा ती तिच्या प्रियकराला भेटली तेव्हा तिचं वजन 50 किलो होतं. मुलानं सांगितलं की जेव्हा ती तिचं वजन वाढवेल आणि लठ्ठ होईल तेव्हा तो तिच्याशी लग्न करेल. त्याच्यावर विश्वास ठेवून, मॉडेलने तिचे वजन वाढवलं, ज्यामुळे तिने मॉडेलिंगची नोकरी गमावली.
advertisement
जेव्हा तिनं तिचं वजन वाढवलं ​​आणि लग्नासाठी तयार झाली तेव्हा तिच्या प्रियकराने तिला सोडून दिलं. मॉडेलला धक्का बसला आहे. सध्या तिनं तिचं वजन कमी करून तिची कहाणी जगासमोर मांडली आहे. सोशल मीडियावर काही लोक त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत तर काही जण तिला खोटं बोलत असल्याचं बोलत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बॉयफ्रेंडला जाड मुली आवडतात, मॉडेलने करिअर सोडलं आणि केलं असं काही....
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement