Budget 2025 : 1 तारखेला आणि 11 वाजताच का सादर करतात भारताचं बजेट? एक नंबरशी कनेक्शन काय?

Last Updated:

Budget 2025 time and date : केंद्रीय बजेट 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर केला जातो. पण 1 तारीख आणि 11 वाजताची वेळच का निवडण्यात आली, हा प्रश्न आहेच.

बजेटच्या तारीख आणि वेळेचं कनेक्शन काय?
बजेटच्या तारीख आणि वेळेचं कनेक्शन काय?
नवी दिल्ली : तुम्ही अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट आवर्जून पाहिली असेल 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता बजेट सादर केला जाणार आहे. तारीख आणि वेळ दोन्हींमध्ये 1 हा आकडा आहे. हा एक नंबर खास आहे का? बजेटसाठी याच नंबरची तारीख आणि वेळ निवडण्यामागचं कारण काय? याचं बजेटशी काय कनेक्शन आहे याचा तुम्ही विचार केला आहे का?
आता केंद्रीय बजेट 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर केला जातो. पण याआधी ही तारीख आणि वेळ नव्हती. सुरुवातीला बजेट 28 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता सादर केला जात असे. ब्रिटिशकाळापासून ठरलेली ही वेळ आणि तारीख नंतर बदलण्यात आली. पण 1 तारीख आणि 11 वाजताची वेळच का निवडण्यात आली, हा प्रश्न आहे.
advertisement
बजेटसाठी 1 तारीखच का?
2017 आधी फेब्रुवारीच्या शेवटी म्हणजे 28 फेब्रुवारीला बजेट सादर केलं जायचं. पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बजेट सादर करण्याची ब्रिटिशकाळापासून सुरू असलेली ही प्रथा 2017 साली बदलण्यात आली. 2017 साली मोदी सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारीच्या शेवटी बजेट सादर करण्याऐवजी 1 फेब्रुवारी म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला बजेट सादर करण्याची परंपरा सुरू केली.
advertisement
ही तारीख बदलण्यामागे त्यांनी 2 कारणं सांगितली होती. पहिलं बजेट सादर करणं आणि लागू होण्याच्या वेळेतील कमी अंतर. बजेट मेमध्ये लागू केलं जातं. 28 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर केल्याने हा वेळ वाढतो. दुसरं रेल्वे बजेट सामान्य बजेटमध्ये विलिनीकरण. आधी रेल्वे बजेट वेगळं सादर केलं जायचं. पण विलीनीकरणामुळे सामान्य बजेट लागू होण्यासाठी नवीन नियम लागू करणं आणि नवीन बदलासाठी पुरेसा वेळ मिळतो.
advertisement
बजेट सादर करण्यासाठी 11 चीच वेळ का?
वेळेचं म्हणला तर ब्रिटिशकाळात सामान्य बजेट संध्याकाळी 5 वाजता सादर केलं जायचं. ही वेळ ब्रिटिशांच्या सोयीनुसार ठेवण्यात आली होती. जेव्हा भारतात संध्याकाळचे 5 वाजायचे तेव्हा ब्रिटनमध्ये दुपारचे 12.30.
advertisement
1999 मध्ये अटर बिहारी वाजपेयी सरकराने बजेटची वेळ बदलली. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पहिल्यांदा संध्याकाळी 5 ऐवजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला. भारत स्वतंत्र आहे, ब्रिटनच्या अधीन नाही. त्यामुळे तो आपल्या परीने वेळ ठरवू शकतो, असं ते म्हणाले.
एकंदर काय तर तसं बजेट आणि एकचं थेट कनेक्शन नाही. तारीख आणि वेळेचा आकडा जुळण्याचा हा निव्वळ योगायोग आहे, हे तुम्हाला समजलं असेलच.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Budget 2025 : 1 तारखेला आणि 11 वाजताच का सादर करतात भारताचं बजेट? एक नंबरशी कनेक्शन काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement