पृथ्वीवरून माणसं नष्ट होणार? जगावर मोठं संकट, शास्त्रज्ञांचा इशारा

Last Updated:

पृथ्वीवरील शेवटचा माणूस हा केवळ चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा विषय नाही. हे प्रत्यक्षात घडू शकतं, असा इशारा शास्त्रज्ञाने दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
वॉशिंग्टन : पृथ्वीचा अंत होणार पण तो कधी आणि कसा याबाबत बरेच दावे केले जातात. पण आता पृथ्वीवरील माणसांच्या अंताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगावर असं संकट आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील माणसं नष्ट होतील, असा इशारा शास्त्रज्ञाने दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मेरिकेतील बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे काम करणारे प्रोफेसर आर्टुरो कासाडेव्हल यांनी माणसांच्या अंताबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या मते, पृथ्वीवरील शेवटचा मानव हा केवळ कल्पनारम्य नसून तो वास्तविक असू शकतो. सुमारे 1000 वैज्ञानिक शोधनिबंध लिहिणारे प्रोफेसर कासडेव्हल यांनी गेल्या महिन्यात एक नवीन पुस्तक प्रकाशित केलं आहे, ज्याचं नाव आहे, वॉट इफ फंगी विन? या पुस्तकात त्यांनी पृथ्वीवरील शेवटच्या माणसासारखी परिस्थिती अशक्य नाही, असं सांगितलं आहे.
advertisement
हे पुस्तक बुरशीमुळे साथीचे रोग होण्याची वास्तविक शक्यता अधोरेखित करतं. बुरशीमुळे साथीचा रोग होऊ शकतो आणि तो मानवजातीचा नाश करू शकतो, असं त्यांनी सांगितलं. .
बुरशीमुळे धोका
डेली स्टारच्या वृत्तात प्रोफेसर कासाडेव्हलचा हवाला देत म्हटलं आहे की, कालांतराने आपल्याला धोकादायक नवीन बुरशी दिसू शकतात यात शंका नाही. यापूर्वीही असं घडलं आहे. वातावरणातील बदलामुळे बुरशी मानवजातीत नवीन रोग आणू शकतात. काही बुरशींमध्ये नवीन रोग पसरवण्याची क्षमता असल्याचं पुरावे वाढत आहेत. जे मानवांना हानी पोहोचवू शकतात.
advertisement
तापमान वाढल्याचा परिणाम
वाढत्या तापमानामुळे आपल्या वातावरणातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत आहे. कासाडेव्हल म्हणाले, जर बुरशी उच्च तापमानात वाढण्यास अनुकूल झाली तर ते आपलं संरक्षण खंडित करेल. ही सर्वात मोठी भीती आहे. बुरशीमध्ये उत्परिवर्तनाचा पुरावा आधीच अस्तित्वात आहे. 2007 मध्ये जपानमधील एका व्यक्तीच्या कानात कॅनडिया ऑरिस नावाची बुरशी आढळून आली होती. 2007 पूर्वी हे शास्त्रज्ञांना माहीत नव्हतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पृथ्वीवरून माणसं नष्ट होणार? जगावर मोठं संकट, शास्त्रज्ञांचा इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement