US Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतात त्या व्हाइट हाऊसमध्ये म्हणे आहेत भुतं, डोनाल्ड ट्रम्पही तिथं राहणार
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
अमेरिकन राष्ट्रपतींचे निवासस्थान म्हणजेच व्हाईट हाउसमध्ये भूतं आहेत असं म्हटलं जातं.कदाचित विश्वासही बसणार नाही. मात्र तिथे काम करणाऱ्यांनी दावे केले आहेत की त्यांनी तिथे भुतांना फिरताना पाहिलंय.
वॉशिंग्टन : जगातील प्रत्येक देशाला प्रमुख असतात. काही देशांचे प्रमुख राष्ट्रपती असतात, तर काही ठिकाणी पंतप्रधान प्रमुख असतात. या प्रमुखांची शासकीय निवासस्थानं असतात, जे राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. जगात असा एक देश आहे जिथे देशाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या शासकीय निवासस्थानात भूतंही राहतात. ही भूतं माजी राष्ट्रपतींची आहेत. त्यांच्यापैकी काहींचे खून झाले होते, तर काहींचे आजारपणामुळे निधन झाले होते. तुम्हाला या देशाचे नाव माहीत आहे का? हा देश अमेरिका आहे.
‘डेली स्टार’ न्यूजच्या वेबसाईटनुसार, अमेरिकन राष्ट्रपतींचे निवासस्थान म्हणजेच व्हाईट हाउसमध्ये भूतं आहेत असं म्हटलं जातं. हे ऐकून तुम्ही चकित झाला असाल, कदाचित विश्वासही बसणार नाही. मात्र तिथे काम करणाऱ्यांनी दावे केले आहेत की त्यांनी तिथे भुतांना फिरताना पाहिलंय.
advertisement
अब्राहम लिंकन यांचं भूत
डेली स्टारच्या वृत्तानुसार, लोकांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि महान नेते अब्राहम लिंकन यांचा आत्मा व्हाईट हाउसच्या वेगवेगळ्या भागांत पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांची हत्या 1865 मध्ये झाली होती. 1942 मध्ये, नेदरलँडची क्वीन विल्हेलमिना व्हाईट हाउसमध्ये थांबली होती, तेव्हा अचानक तिला तिच्या खोलीच्या दारावर ठोठावण्याचा आवाज आला. तिने दार उघडल्यावर समोर अब्राहम लिंकन यांचं भूत होतं. व्हाईट हाउसमध्ये विन्स्टन चर्चिल यांनाही लिंकन यांचं भूत दिसल्याची चर्चाही होते. रोनाल्ड रीगन यांचा कुत्रा रेक्सदेखील लिंकन यांच्या बेडरूमकडे पाहून भुंकायचा, मात्र खोलीत जायचा नाही.
advertisement
इतर राष्ट्रपतींची भूतं पाहिल्याचे दावे
लिंकन यांच्याव्यतिरिक्त 1800 च्या काळात अमेरिकेचे 32 दिवसांचे राष्ट्रपती विल्यम हेन्री हॅरिसन यांचं भूत व्हाईट हाउसमध्ये दिसलं होतं. हेन्रींचं निधन न्यूमोनियामुळे 1841 मध्ये झाले होते. व्हाईट हाउसमध्ये लोकांनी रहस्यमयी व्हायोलिनचे आवाज ऐकले. माजी राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांचं भूत ते व्हायोलिन वाजवतं, असं म्हणतात. जेफरसन 1801 ते 1809 दरम्यान राष्ट्रपती होते. इतरही अनेक राष्ट्रपतींची भूतं व्हाईट हाउसमध्ये पाहिल्याचे दावे तिथे काम करणाऱ्यांनी केले आहेत.
advertisement
(सूचना : हा लेख माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अशा कोणत्याही दाव्याचं न्यूज18मराठी समर्थन करत नाही किंवा त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 06, 2024 2:06 PM IST
मराठी बातम्या/Viral/
US Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतात त्या व्हाइट हाऊसमध्ये म्हणे आहेत भुतं, डोनाल्ड ट्रम्पही तिथं राहणार


