advertisement

OMG! मटणाने खाल्लं चिकन, आयुष्यात पाहिला नसेल असा VIDEO, पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Last Updated:

Chicken Eat Mutton : कधी मटणाने चिकन खाल्ल्याचे तुम्ही ऐकलं तरी आहे का? आपल्या कल्पनेतही येणार नाही असं दृश्य प्रत्यक्षात पाहायला मिळतं आहे. एका बकरीने चक्क कोंबडीला खाल्लं आहे. 

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : श्रावण संपायला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी श्रावण म्हणून नॉनव्हेज खाणं थांबवलं आहे. कधी एकदा श्रावण संपतो आणि मासे, चिकन, मटणावर ताव मारतो असं कित्येकांना झालं असेल. पण श्रावण संपायच्या आधीच एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
नॉनव्हेज म्हटलं तर कुणाला मासे आवडतात, कुणाला चिकन आवडतं, तर कुणाला मटण. पण कधी मटणाने चिकन खाल्ल्याचे तुम्ही ऐकलं तरी आहे का? आपल्या कल्पनेतही येणार नाही असं दृश्य प्रत्यक्षात पाहायला मिळतं आहे. एका बकरीने चक्क कोंबडीला खाल्लं आहे.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक बकरी एका कोंबडीच्या पिल्लाला खाताना दिसत आहे एक कोंबडी तिच्या पिल्लांसह बकरीजवळून जात असल्याचं दिसतं आहे. अचानक एक पिल्लू बकरीच्या अगदी जवळ गेलं आणि बकरीने वेळ न घालवता तिला तोंडात घेतलं.
हे दृश्य इतकं धक्कादायक आहे ज्यांनी ते पाहिलं ते शॉक झाले आहेत. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युझर्सनी ते मजेदार पद्धतीने घेतलं आहे. उत्तर भारतात श्रावण संपला आहे, बहुतेक तिथल्याच एका युझरने लिहिलं आहे, श्रावण संपताच बकरीने मांसाहारी होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या युझरने कमेंट केली, ही बकरी सर्वकालीन महान बनली आहे. पण बरेच लोक या बकरीच्या या वर्तनाबद्दल चिंतेतदेखील आहेत.  बकरीचं हे कृत्य सामान्य आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे? असा प्रश्न काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Utrended (@utrended)



advertisement
पशुवैद्य आणि वर्तन तज्ज्ञ डॉ. अजय शर्मा यांनी याबाबत सांगितलं की, बकरी नैसर्गिकरित्या शाकाहारी असतात आणि त्यांच्या आहारात गवत, पाने, धान्य आणि फळे आणि भाज्या असतात. पण काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये शेळ्या मांसाहारी वर्तन दाखवू शकतात. हे वर्तन पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे असू शकतं. विशेषतः प्रथिने किंवा खनिजांच्या कमतरतेमुळे. श्रावणता पावसामुळे गवताच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे शेळीने पिल्लू खाण्याचा प्रयत्न केला असावा."
advertisement
@utrended इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! मटणाने खाल्लं चिकन, आयुष्यात पाहिला नसेल असा VIDEO, पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement