बाबो! सर्वात जास्त वेळ फोनवर बोलण्याचा रेकॉर्ड; कोण कोणाशी बोललं होतं?

Last Updated:

फारफार तर किती वेळ तुम्ही बोलाल एक तास, दोन तास, तीन तास... पण दोन व्यक्ती एकमेकांशी फोनवर इतक्या वेळ बोलल्या आहेत की त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.

फोटो : प्रातिनिधिक
फोटो : प्रातिनिधिक
नवी दिल्ली : कपलला तुम्ही फोनवर एकमेकांशी बोलताना पाहिलं असेल. काही कपल तर तासनतास फोनवर बोलतात. तुम्हीही अशा कितातरी वेळ फोनवर गप्पा मारत असाल. पण फारफार तर किती वेळ तुम्ही बोलाल एक तास, दोन तास, तीन तास... पण दोन व्यक्ती एकमेकांशी फोनवर इतक्या वेळ बोलल्या आहेत की त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे.
बऱ्याचदा आपण एखाद्याला फोन करतो आणि बराच वेळ बोलतो. बोलण्यात किती वेळ कधी निघून जातो समजतही नाही. फोन ठेवल्यावर अरे बापरे आपण इतका वेळ फोनवर बोलत होतो, याचं आपल्याला आश्चर्य वाटतं.  एकमेकांशी फोनवर बराच वेळ बोलताना सर्वात जास्त वेळ फोनवर कोण आणि किती वेळ बोललं असेल याचा तुम्ही कधी विचार केला होता का?
advertisement
सर्वात लांब कॉलचा रेकॉर्ड
मोबाईल फोनवर सर्वात जास्त वेळ फोन कॉलचा रेकॉर्ड 2012 मध्ये बनला होता. हा दीर्घ फोन कॉल हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एरिक आर. ब्रूस्टर आणि एव्हरी ए. लिओनार्ड यांनी रेकॉर्ड केला होता. एरिक आर. ब्रूस्टर आणि एव्हरी ए. लिओनार्ड यांच्यातील हा फोन कॉल एका चिट चॅट शोमध्ये करण्यात आला होता.
advertisement
हा वैयक्तिक कॉल होता. या कॉलसाठी नियमही करण्यात आले होते. दोघांनाही 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ शांत राहण्यास मनाई होती. दोघांनाही कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या टाळण्यासाठी प्रत्येक तासाला 5 मिनिटांचा ब्रेक देण्यात आला होता.
advertisement
एरिक, एव्हरी एकमेकांशी किती वेळ बोलले?
दोघांनी एका कॉलमध्ये सुमारे 46 तास 12 मिनिटे 52 सेकंद घालवले. याआधी 2009 मध्ये सर्वात लांब कॉल करण्याचा विक्रम सुनील प्रभाकरच्या नावावर नव्हता. या कॉलमध्ये ते वेगवेगळ्या लोकांशी जोडले गेले. म्हणजे ते वेगवेगळ्या लोकांशी फोनवर बोलले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बाबो! सर्वात जास्त वेळ फोनवर बोलण्याचा रेकॉर्ड; कोण कोणाशी बोललं होतं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement