पाणी आणायला गेलं आणि थेट तलावात कोसळलं हॅलिकॉप्टर; सेकंदात झाले तुकडे-तुकडे, थरारक Video Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
फ्रान्समध्ये जंगलाला लागलेल्या आगीमुळे हाहाकार माजला आहे. या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो जवान आणि विमानं तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत पॅरिसपेक्षा मोठा भूभाग आगीच्या तांडवात जळून गेला आहे आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं देखील समोर आलं आहे
मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाण्याची बादली भरायला आलेला हॅलीकॉप्टर क्रॅश झाल्याचं दिसत आहे. खूप वाईट पद्धतीने हा क्रॅश झाला. हा व्हिडीओ खरोखरंच अंगावर काटा आणणारा आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. काय घडलं? कसं घडलं? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
फ्रान्समध्ये जंगलाला लागलेल्या आगीमुळे हाहाकार माजला आहे. या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो जवान आणि विमानं तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत पॅरिसपेक्षा मोठा भूभाग आगीच्या तांडवात जळून गेला आहे आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं देखील समोर आलं आहे, तर या आगीत किमान 13 जण जखमी झाले आहेत, त्यात 11 अग्निशामक जवानांचा समावेश आहे.
advertisement
काय आणि कसं घडलं?
24 ऑगस्टच्या संध्याकाळी पश्चिम फ्रान्समधील रॉस्पोर्डन परिसरातील आग विझवण्याच्या माहिमेवर एक हेलिकॉप्टर होतं. त्यावेळी हे हेलिकॉप्टर एका तलावामधून बादलीभरुन पाणी वाहून नेत होतं, त्या दरम्यान हेलिकॉप्टरचा बॅलेंस बिघडला आणि ते कोसळलं, ज्यामुळे हेलिकॉप्टरचे तुकडे तुकडे झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमधील कर्मचारी वेळीच बाहेर पडले.
advertisement
व्हिडिओत काय दिसतंय?
या घटनेचा व्हिडिओ खळबळ माजवणारा आहे. त्यात हेलिकॉप्टरचे शेपूट पाण्यात बुडताना दिसते आणि काही सेकंदांतच त्याचा तोल जातो. हेलिकॉप्टर फिरत पाण्यात आदळते आणि क्षणार्धात तुकडे तुकडे होते.
advertisement
साक्षीदारांचं काय म्हणणंं?
एक साक्षीदार डेविड यांनी द सनला सांगितले, “ते खूपच खाली आले आणि वेगाने उतरत होते. मला वाटलं ते फुटणार किंवा तुकडे होणार. एकदा ते उलटलं आणि लगेच सर्व दिशांनी फेकलं गेलं.” थिबॉल्ट या युवकाने France3 ला सांगितले की, तो आपल्या मित्रांसोबत तलावाजवळ आराम करत होता. हेलिकॉप्टर येताना पाहून त्याने व्हिडिओ काढला, पण क्षणात अपघाताचा थरार टिपला गेला.
advertisement
अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या प्रसंगी पायलट आणि क्रूने दाखवलेल्या शांततेचं कौतुक केलं. काही वेळाने दुसऱ्या हेलिकॉप्टरने आग विझवण्याचे काम पुन्हा सुरू केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/Viral/
पाणी आणायला गेलं आणि थेट तलावात कोसळलं हॅलिकॉप्टर; सेकंदात झाले तुकडे-तुकडे, थरारक Video Viral


