एक नंबरची दारूडी, रूम बंद करून दारू ढोसायची, पिणं थांबवल्यावर भयंकर अवस्था
- Published by:Priya Lad
Last Updated:
Quit Alcohol Effect : जोपर्यंत ती तिच्या नोकरीत व्यस्त होती, तोपर्यंत तिने तिचं दारूचं व्यसन सहजपणे लपवलं. पण तिने सोडल्यानंतर जे घडलं ते तिला उद्ध्वस्त करत होतं. सुधारणा होण्याऐवजी तिचं जीवन आणखी गुंतागुंतीचे झालं.
नवी दिल्ली : दारू... एक व्यसन... एकदा का जडलं की सुटता सुटत नाही. दररोज दारू पिणाऱ्या व्यक्तीची अवस्था काही तुम्हाला सांगायला नको. पण या व्यक्तीने दारू सोडली तर त्याची काय अवस्था होईल तुम्ही कधी विचार केला आहे का? अशीच एक दारूडी महिला, जी बंद खोलीत खूप दारू ढोसायची. तिने दारू सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे.
33 वर्षांची ज्युली मॅकफॅडेन, जी अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहते. ती एक नर्स आहे. ती खूप आधीपासून दारू पिते. इतकं की आधी ती बंद खोलीत दारू प्यायची. ज्युलीला नेहमीच वाटायचं की दारू एक कमकुवतपणा आहे, पण ती मोठी समस्या नाही. मी माझं काम चांगलं करते, काही समस्या नाही. पण जर तिला योग्य जागा किंवा योग्य मित्र सापडले तर ती ही सवय सोडेल. मग एके दिवशी ज्युलीने ठरवलं की आता पुरे झालं, आता ती दारू सोडणार. यामळे आपलं आयुष्य सुधारेल. ती जीम, प्रवास असे स्वतःचे सगळे छंद जोपासेल. पण प्रत्यक्षात असं काहीही घडलं नाही.
advertisement
जेव्हा तिने दारू सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिची प्रकृती सुधारण्याऐवजी अधिक बिघडली. जोपर्यंत ती तिच्या नोकरीत व्यस्त होती, तोपर्यंत तिने तिचं व्यसन सहजपणे लपवलं. पण तिने सोडल्यानंतर जे घडलं ते जुलीला उद्ध्वस्त करत होतं. सुधारणा होण्याऐवजी तिचे जीवन आणखी गुंतागुंतीचे झालं. तिने सांगितलं की घराबाहेर पडताना, मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये जाताना किंवा इतर कोणतंही सामान्य काम करताना तिला भीती वाटत होती.
advertisement
तिला आश्चर्य वाटलं, "मी इतका मोठा त्याग केला आहे, तरीही मी अजूनही आनंदी का नाही?" तेव्हा ज्युलीला जाणवलं की तिचं व्यसन बंद खोलीत दारू पिण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तिने तिच्या विचारांवर ताबा मिळवला होता. दारूने तिच्या मनाला शांतीची सवय लावली होती आणि ती निघताच, ताणतणाव आणि एकाकीपणाने तिला वेढलं.
advertisement
जेव्हा ज्युलीने तिच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत तिची समस्या सांगण्याचं धाडस केलं तेव्हा तिला हे सत्य कळलं. ओळखीच्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितलं, "तू पूर्णपणे मद्यपी झाली आहेस." तिने ज्युलीला एकट्याने संघर्ष करण्यापेक्षा रिकव्हरी ग्रुपची गरज असल्याचं सांगितलं. तेव्हाच ज्युलीला समजलं की व्यसन हे फक्त मद्यपान करण्याची सवय नाही तर विचार करण्याची एक पद्धत आहे. जेव्हा तिने प्रोफेशनल्सची मदत घेतली आणि दारू न पिणाऱ्या व्यक्तींशी ती बोलू लागली तेव्हा तिचं जीवन पुन्हा रुळावर आलं.
advertisement
खूप दारू पिणारे लोक सामान्यतः मद्यपी व्यक्तीपेक्षा खूप वेगळ असतात. ते बहुतेकदा त्यांच्या नोकरीत आणि कौटुंबिक जीवनात खूप चांगले असतात, पण एकटे असताना ते खूप मद्यपान करतात. दारू पिऊन तोल जाणाऱ्यांपेक्षा ते वेगळे असतात. यामुळे त्यांना अनेक समस्या देखील निर्माण होतात. जर अशा लोकांनी दारू सोडली तर त्यांना सामाजिक संबंध राखण्यास त्रास होऊ शकतो.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 11, 2025 10:32 AM IST