Jugaad : एवढी उंच गाडी चालवणार कशी? व्यक्तीचा जुगाड पाहून डोक्यावर माराल हात
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जुगाडू लोकांची जगात काही कमतरता नाही. लोक वेगवेगळ्या कल्पना आजमावत हटके जुगाड बनवत असतात. कोण कधी काय जुगाड करुन वस्तू बनवेल काही सांगू शकत नाही.
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : जुगाडू लोकांची जगात काही कमतरता नाही. लोक वेगवेगळ्या कल्पना आजमावत हटके जुगाड बनवत असतात. कोण कधी काय जुगाड करुन वस्तू बनवेल काही सांगू शकत नाही. असे जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर कायमत पहायला मिळतात. प्रत्येक वेळी नवे जुगाड पहायला मिळतात. अनेक थक्क करणारे, मजेशीर, विचित्र आश्चर्यकारक जुगाडू व्हिडीओ चर्चेत येत असतात. असाच एक जुगाडू व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्ही डोक्यावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. एका जुगाडू व्यक्तीनं उंच बाईक बनवलीय. ही विचित्र जुगाडू बाईक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
एका व्यक्तीनं उंच बाईक बनवलीय. ही बाईक बघून कोणीही चकित होईल. एवढ्या उंचावर बसून गाडी चालवण्याचा हा जुगाड सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक तरुण बाईकवर बसला आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही अनोखी बाईक लोखंडापासून बनवलेल्या सपोर्टवर आहे. त्यावर स्वार होणं अजिबात सुरक्षित नाही. चुकून काही घडलं तर दुर्घटना घडू शकते. मात्र जुगाडू व्यक्ती एवढ्या उंचावर बाईकवर चढला आहे. खाली काही लोक सपोर्टसाठी उभे आहेत. मग अशा प्रकारे ही गाडी चालवणार कशी? असा अनेकांना प्रश्न पडलाय.
advertisement
advertisement
re4team नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. हा जुगाड पाहून नेटकरीही थक्क झालेत. काहींनी म्हटलं लोक मरण्यासाठी आता असे जुगाड शोधत आहे तर काहींनी म्हटलं, ही गाडी चालवणार तरी कशी, ज्यांच्याकडे काही काम नाही ते असे फालकू गोष्टी करत आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 31, 2023 11:31 AM IST









