प्रेम झालं, 3 महिन्यात लव्ह मॅरेज, 6 महिन्यांनी हनीमून, नवरी बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत

Last Updated:

जेव्हा हॉटेलचा एक कर्मचारी त्याच्या खोलीची तपासणी करण्यासाठी आला तेव्हा खोलीची अवस्था पाहून तो थक्क झाला.

News18
News18
नवी दिल्ली : एक कपल ज्यांनी एकमेकांवर प्रेम केलं. प्रेमात पडल्यानंतर 3 महिन्यांनी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर कित्येक कपल हनीमूनसाठी उत्सुक असतात. हे कपल ही हनीमूनला जाण्याच्या तयारीत होतं. लग्नानंतर 6 महिन्यांनी ते हनीमूनला गेले. पण नवरी बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत होती.
ब्रॅडली रॉबर्ट आणि क्रिस्टी चेन यांची पहिली भेट नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती आणि तीन महिन्यांनंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. 38 वर्षीय डॉसन घटस्फोटित होता. लग्नानंतर या कपलने एक नवीन घर खरेदी केले. ते दोघेही मेम्फिसमध्ये खरेदी केलेल्या त्यांच्या नवीन घरात राहत होते.
यानंतर दोघांनीही वर्षाच्या अखेरीस हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला आणि जुलै 2022 मध्ये दोघंही हनीमूनला गेले. या हनिमूनचा खर्च गिफ्ट म्हणून मुलीच्या कुटुंबाने केला होता. ते हनीमूनसाठी फिजीला गेले होते.
advertisement
9 जुलै रोजी रिसॉर्ट कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की हे कपल नाश्त्यासाठी आले नाही आणि ते दुपारचं जेवण करतानाही दिसले नाही. दुपारनंतर, जेव्हा हॉटेलचा एक कर्मचारी त्याच्या खोलीची तपासणी करण्यासाठी आला तेव्हा खोलीची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. खरंतर, या हॉटेल कर्मचाऱ्याला तिथे एक मृतदेह सापडला जो क्रिस्टेचा होता. हा मृतदेह खोलीच्या बाथरूममध्ये होता. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापतीच्या खुणा होत्या आणि अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. डॉसन रूम मध्ये नव्हता.
advertisement
डेली स्टारच्या वृत्तानुसार, एक दिवस आधी दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचं समोर आलं. हॉटेलमधून बाहेर पडताना हे कपल वाद घालताना दिसलं. आता न्यायालयाने पतीला दोषी ठरवलं आहे आणि त्याला 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्रेम झालं, 3 महिन्यात लव्ह मॅरेज, 6 महिन्यांनी हनीमून, नवरी बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement