ही शिट्टी म्हणजे मृत्यूचा इशारा; जंगलात किंवा शेतात आवाज आला तर थेट काढा पळ, मागे पाहण्यातही वेळ घालवू नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका विशिष्ट जीवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी आता जंगलात किंवा शेतात जातात सतर्क राहण्याची गरज आहे.
मुंबई : पावसाळा सुरू झाला, की सापांचे प्रमाण झपाट्याने वाढतं. शहर असो किंवा गाव, चिखल, ओलसर जागा आणि गवताळ भागांमध्ये साप सहज सापडतात. पण यंदा एका विशिष्ट सापामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तो साप म्हणजे रसेल वायपर. हा भारतातील सर्वात विषारी आणि धोकादायक सापांपैकी एक.
हा साप जेव्हा फुसफुसतो तेव्हा प्रेशर कुकरमधून निघणाऱ्या शिट्टीसारखा आवाज करतो, म्हणूनच लोक याला 'मरणाची सीटी' असंही म्हणतात. सापाचं असं फुसफुसणं म्हणजे तो हल्ल्याची तयारी करत आहे. म्हणजेच हा साप हल्ला करणार हे नक्की.
गेल्या काही आठवड्यांपासून आसाम, कर्नाटकमधील ग्रामीण भाग आणि राजस्थानातील वाळवंटी क्षेत्रांमध्ये रसेल वायपरच्या चाव्याचे अनेक प्रकार नोंदवले गेले आहेत. भारतात सर्वदूर या सापाचा वावर आहे. खासकरून शेतीच्या परिसरात, गवताळ मैदानांमध्ये आणि आता तर काही शहरी भागातही तो दिसू लागला आहे. कारण तो मुख्यतः उंदीर खातो आणि उंदीर शहरांमध्येही भरपूर असतात.
advertisement
या सापाचं विष हे हीमोटॉक्सिक प्रकाराचं असतं, जे रक्ताच्या गाठी तयार करतं आणि किडनी फेल होण्याची शक्यता वाढवतो. फक्त 40 मिग्रॅ विष सुद्धा माणसाचा जीव घेऊ शकतो आणि हा साप एका चाव्यात 130 ते 250 मिग्रॅ पर्यंत विष सोडू शकतो.
याची सीटी ऐकली, तर मागे वळूनही पाहू नका
रसेल वायपर अचानक हल्ला करत नाही. पण एकदा त्याला धोका जाणवला, की तो एस (S) आकारात शरीर वाकवतो, अंग उचलतो आणि जोरात फुसफुसतो. त्याचं हे असं फुफसणं म्हणजे 'सावधान मी हल्ला करतोय!' असा इशारा. हे ऐकूनही कोणी दुर्लक्ष केलं, तर पुढचा क्षण प्राणघातक ठरतो.
advertisement
आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात एका १३ वर्षांच्या मुलाला रसेल वायपरने चावलं आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना पुन्हा एकदा याच्या धोक्याची आठवण करून देते.
गवताळ, ओलसर जागांमध्ये चालताना शूज आणि फुल पँट घाला, शेतात किंवा झाडाजवळ काम करताना काठीने जमिनीत आवाज करा. रात्री बाहेर जाताना टॉर्च वापरा, जर 'सीटी' सारखा आवाज ऐकू आला, तर लगेच त्या ठिकाणाहून निघून जा
advertisement
रसेल वायपर नक्कीच आक्रमक नाही, पण अनवधानाने त्याच्या वाटेवर गेलात, तर तो क्षणात हल्ला करतो. त्यामुळे अशा फुसफुसणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. हा आवाज मृत्यूची सूचना देत असतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ही शिट्टी म्हणजे मृत्यूचा इशारा; जंगलात किंवा शेतात आवाज आला तर थेट काढा पळ, मागे पाहण्यातही वेळ घालवू नका


