महाराष्ट्राहून निघालेली रेल्वे ट्रॅकवरच अचानक गायब झाली, 43 वर्षांनंतर अखेर 'मिस्ट्री ट्रेन'चं रहस्य उलगडलं

Last Updated:

Indian Train Mystery : जगभरात विमाने, ट्रेन गायब होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यात एक भारतीय ट्रेनही आहे. महाराष्ट्राहून आसामसाठी निघालेली ही ट्रेन ट्रॅकवरून अचानक गायब झाली. आता 43 वर्षांनंतर त्या मिस्ट्री ट्रेनचं रहस्य अखेर उलगडलं आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
बर्म्युडा ट्रँगल हे ठिकाण तुम्हाला माहिती आहेच. इथं विमानं गायब झाल्याच्या स्टोरी तुम्ही ऐकल्या असतील. भारतातील असाच एक रेल्वे ट्रॅक जिथं 43 वर्षांपूर्वी एक ट्रेन गायब झाली होती. महाराष्ट्रातील अहमदनगरहून आसामच्या तिनसुकियासाठी निघालेली ही मिस्ट्री ट्रेन. आता तब्बल 43 वर्षांनी अचानक दिसली आहे. भारतीय रेल्वेच्या या ट्रेनच्या बेपत्ता होण्याच्या कथेने जितकी रंजकता आणली तितकीच तिच्या शोधामुळे आणखी खळबळ उडाली.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं उपग्रह आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलांचं मॅपिंग करत होतं. तेव्हा तिनसुकियापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनजवळील जंगलांत नासाला काहीतरी दिसलं. नासाने दावा केला की त्यांनी तिनसुकियाच्या जंगलात लपलेला इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) रॅक दाखवला आहे.
advertisement
अमेरिकेच्या उपग्रह प्रतिमांनंतर रशिया आणि चीनच्या हालचाली सुरू झाल्या. रशियन आणि चिनी हेरांनी ट्रेन रॅकचा शोध सुरू केला. तीनसुकियावर परदेशी उपग्रहांच्या असामान्य हालचालींमुळे भारतीय एजन्सी गोंधळल्या. त्यानंतर संरक्षण गुप्तचर संस्था, राष्ट्रीय तपास संस्था, संरक्षण मंत्रालय आणि सुरक्षा मंत्रिमंडळ समिती शोधात सामील झाली. भारतीय एजन्सींच्या तपासात असं दिसून आलं की फोटोत दाखवलेल्या तीनसुकिया रेल्वे स्थानकाजवळील जंगलात एक ट्रेन रॅक खरोखर अस्तित्वात होता. जेव्हा रेल्वेने या प्रकरणाची अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना आढळलं की हा ट्रेन रॅक 1976 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगरहून आसाममधील तीनसुकिया रेल्वे स्थानकात आणण्यात आला होता.
advertisement
ट्रेन गायब झाली कशी?
रेल्वेच्या नोंदीनुसार अहमदनगरहून निघालेली ट्रेन 16 जून 1976 रोजी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी तीनसुकियाला पोहोचली. काही मालवाहू गाड्या लोड करण्यासाठी इंजिन रॅकपासून वेगळं करण्यात आलं आणि स्टेशनवर परत आणण्यात आलं. त्याच दिवशी सकाळी 11 वाजून 31 मिनिटांनी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. इतका पाऊस पडला की पूर आला. तिनसुकिया रेल्वे स्टेशनही पाण्यात बुडालं. रेल्वे कर्मचारी वाहतूक सुरळीत ठेवण्यात रुळांची दुरुस्ती करण्यात आणि पुराचा सामना करण्यात व्यस्त होते. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देताना रेल्वे कर्मचारी ट्रेनचा रॅक परत आणण्यास विसरले.
advertisement
कालांतराने संपूर्ण परिसरात हळूहळू मोठी झुडपं वाढली आणि ट्रेन रॅक झुडुपे, तणाखाली लपला गेला. साप, विंचू आणि इतर वन्य प्राण्यांनी या भागात आपलं घर बनवलं.  ट्रेनचा पायलट डॅनियल स्मिथ सप्टेंबर 1976 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला. ट्रेनचे रेल्वे मास्टर आणि काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. जसजसा वेळ गेला तसतसे त्यावेळचे बहुतेक रेल्वे कर्मचारी निवृत्त झाले आणि कोणालाही ट्रेन लक्षात राहिली नाही.
advertisement
नासाच्या प्रतिमांमध्ये सापडलेला ट्रेन रॅक मुख्य स्टेशनपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर एका ओसाड भागात उभा होता. पुरामुळे त्याकडे जाणारा रेल्वे ट्रॅक वाहून गेला. ट्रॅकचे अवशेष झाडांनी भरले होते.
फोटो सौजन्य : Facebook/The Truth
फोटो सौजन्य : Facebook/The Truth
अहमदनगरहून येणारी ही ट्रेन डिसेंबर 2019 मध्ये एका अमेरिकन उपग्रहाने तिचे फोटो काढेपर्यंत मोठ्या प्रमाणात चर्चेत नव्हती.  2020 मध्ये जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा नॉर्दर्न रेल्वेनं सांगितलं की त्यांना अशा कोणत्याही बेपत्ता ट्रेनची माहिती नाही. शिवाय नॉर्दर्न फ्रंटियर रेल्वेने सोशल मीडियावर असंही म्हटलं होतं की त्यांना ट्रेनच्या शोधाच्या कोणत्याही रेल्वे चौकशीची माहिती नाही. पण 2020 मधील काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की भारतीय एजन्सींना वाटलं की ट्रेन जंगलात लपून बसणं हे एखाद्या विचित्र व्यक्तीचे किंवा विचित्र डॉक्टरचं काम आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
महाराष्ट्राहून निघालेली रेल्वे ट्रॅकवरच अचानक गायब झाली, 43 वर्षांनंतर अखेर 'मिस्ट्री ट्रेन'चं रहस्य उलगडलं
Next Article
advertisement
Supreme Court Local Body Election: ''निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, पण...'', सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर काय सांगितलं?
'निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप नाही, पण..',कोर्टाने नगर परिषद निवडणुकीवर काय सांग
  • ''निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, पण...'', राज्यातील निवडणुकीवर सुप्रीम

  • ''निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, पण...'', राज्यातील निवडणुकीवर सुप्रीम

  • ''निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही, पण...'', राज्यातील निवडणुकीवर सुप्रीम

View All
advertisement