कित्येक भारतीयांच्या घरात पडून असलेली ही मिठाई पाकिस्तानात आवडीने खातात; 5 पट महाग
- Published by:Priya Lad
Last Updated:
भारतीय घरांमध्ये असणारी ही मिठाई कित्येक भारतीय खात नाहीत, पण तीच मिठाई पाकिस्तानात महागड्या किमतीत विकली जात आहे. त्याची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल.
कराची : नुकतीच दिवाळी झाली. दिवाळी म्हणजे घराघरात गोड मिठाई. दिवाळीत येणाऱ्या अशाच मिठाईपैकी एक मिठाई तर तर कित्येक घरात अजूनही पडून असेल. ही मिठाई जवळपास सगळ्या भारतीयांच्या घरात असते. या मिठाईकडे कित्येक भारतीय ढुंगूनही पाहत नाही. पण पाकिस्तानात मात्र हीच मिठाई लोक आवडीने खात आहेत, किंबहुना मोठ्या किमतीला ती विकली जात आहे.
पाकिस्तानात विकल्या जाणाऱ्या या भारतीय मिठाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पाकिस्तानातील एका मिठाईच्या दुकानातील हा व्हिडीओ. एक पाकिस्तानी पत्रकार त्या दुकानदाराशी बोलते आहे.
@2k25news इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी महिला पत्रकार हातात मायक्रोफोन घेऊन एका मिठाईच्या दुकानात येते. दुकानात पोहोचल्यावर ती दुकानदाराला विचारते, "मी पहिल्यांदाच सोनपापडीबद्दल ऐकलं आहे. ते काय आहे?" दुकानदार हसून उत्तर देतो, "ही भारतातील मिठाई आहे, हल्दीरामची सोनपापडी. ती इथं खूप प्रसिद्ध आहे आणि लोकांना ती आवडते."
advertisement
किंमत ऐकून पत्रकाराला धक्का
यानंतर या मिठाईची किंमत किती आहे, असं ही पत्रकार त्या दुकानदाराला विचारते. तेव्हा दुकानदार सांगतो "भारतात याची किंमत 210 रुपये आहे, पण पाकिस्तानात ती 1300 रुपयांना विकली जाते." हे ऐकून पत्रकार आश्चर्याने विचारतो, "ती इतकी महाग कशी झाली?" दुकानदार हसत उत्तर देतो, "भारतातून कमी माल येतो आणि त्याशिवाय चलनात फरक असतो, म्हणून किंमत वाढते."
advertisement
advertisement
पत्रकार सोन पापडीच्या बॉक्सवरील लाइन वाचतो, 'देशी तूपाने बनवलेले' आणि हसून म्हणतो, "वाह, ही पूर्णपणे भारतीय मिठाई आहे." यावर दुकानदार उत्तर देतो, "हो, हल्दीराम हा एक भारतीय ब्रँड आहे आणि त्यांचे गोड पदार्थ पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत." व्हिडिओच्या शेवटी, पत्रकार म्हणतो, "पाहा, चवीला मर्यादा नाहीत. देश वेगवेगळे असू शकतात, पण गोडवा सर्वांना एकत्र करतो." या एका ओळीने संपूर्ण व्हिडिओ आणखी हृदयस्पर्शी बनवला.
advertisement
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे, हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि हजारोंनी लाइप केला. लोकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं की, "सोन पापडी फक्त एक गोड पदार्थ नाही, तर ती भारताची ओळख आहे." दुसऱ्याने लिहिलं की, "सोन पापडी एक गोड पदार्थ आहे जी घरात शिरली की, संपूर्ण परिसरात पसरते." तिसऱ्याने विनोदाने लिहिलं की, "पाकिस्तानातील लोकांनी इथं येऊन ती खरेदी करावी."
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 07, 2025 7:00 AM IST
मराठी बातम्या/Viral/
कित्येक भारतीयांच्या घरात पडून असलेली ही मिठाई पाकिस्तानात आवडीने खातात; 5 पट महाग


