KBC 17 मध्ये चमकला बिहारचा मिथिलेश कुमार, 'या' प्रश्नाचं उत्तर देत जिंकले 25 लाख, पण 50 लाखांचं उत्तर देता केली चुक

Last Updated:

या मंचावर खेळताना प्रत्येक स्पर्धकाची एक वेगळी कहाणी असते आणि अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे बिहारच्या मिथिलेश कुमार यांची.

KBC 17
KBC 17
मुंबई : ज्ञानाची आवड माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, हे आपण अनेकदा टीव्ही शो आणि रिऍलिटी शोमधून पाहिलं आहे. ‘कौन बनेगा करोड़पति’ (KBC) हा असाच एक मंच आहे, जिथे सामान्य घरातील लोक त्यांच्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर मोठं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या मंचावर खेळताना प्रत्येक स्पर्धकाची एक वेगळी कहाणी असते आणि अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे बिहारच्या मिथिलेश कुमार यांची.
बिहारमधील एका छोट्या गावातून आलेले मिथिलेश साधारण कुटुंबातून आहेत, लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांना सामान्य ज्ञानाची विशेष आवड होती आणि गावातील शाळेत शिकत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की, एक दिवस ते केबीसीच्या हॉट सीटवर बसणारच. त्यांचं स्वप्न डिएसपी बनण्याचे होतं, मात्र तीन वेळा हाइटच्या निकषामुळे त्यांना या परीक्षेतून बाहेर व्हावं लागलं. शोदरम्यान त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या उंचीचं कौतुकही केलं.
advertisement
25 ऑगस्टच्या भागात स्पर्धक दीपक 25 लाखांच्या प्रश्नावरून बाहेर पडले होते. तर 26 ऑगस्टच्या भागात मिथिलेश कुमार यांनी हॉट सीटवर बसताच बिग बीचं मन जिंकून घेतलं. पहिल्या प्रश्नापासून ते चौदाव्या प्रश्नापर्यंत त्यांनी आत्मविश्वासाने खेळ खेळला आणि 25 लाखांच्या प्रश्नावर पोहोचल्यावरही ते अजिबात घाबरले नाहीत आणि ऑडियन्स पॉल ही लाईफलाइन वापरली.
advertisement
त्यावेळी 25 लाखांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की कोणत्या देशाने आपल्या नागरिकांना ब्रॉडबँड इंटरनेटचा कायदेशीर अधिकार दिला?
पर्याय:
A. फिनलंड
B. कॅनडा
C. न्यूझीलंड
D. जर्मनी
मिथिलेश यांनी योग्य उत्तर फिनलंड देत 25 लाख रुपये जिंकले. ही रक्कम जिंकल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते आपल्या भावासाठी या वेळेस वाढदिवसानिमित्त सायकल घेणार आहेत. कारण आतापर्यंत त्यांच्याकडे कधीच वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नव्हते.
advertisement
अमिताभ यांनी खेळ पुढे नेला. मिथिलेश कुमार यांना त्यांनी 50 लाख रुपयांसाठी एक प्रश्न विचारला, जो दिल्लीच्या लाल किल्ल्याशी संबंधित होता. मिथिलेश यांना उत्तर माहीत होतं, पण एक छोटीशी चूक झाली. प्रश्न असा होता की, दिल्लीच्या लाल किल्ल्याचे डिझाईन करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, त्या वास्तुकाराच्या नावात कोणत्या शहराचं नाव येतं?
advertisement
मिथिलेश कुमार यांना आपल्या उत्तरावर पूर्ण विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी '50-50' लाइफलाइनचा वापर केला. पण तरीही ते गोंधळात होती, अशावेळी त्यांनी धोका न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, 'कौन बनेगा करोडपती 17' चा खेळ सोडण्यापूर्वी मिथिलेश यांनी पर्याय C) लाहोर निवडला आणि तेच योग्य उत्तर ठरलं. होस्ट अमिताभ बच्चनसह सगळेच आश्चर्यचकित झाले. शेवटी मिथिलेश यांनी 25 लाख रुपये जिंकून घरी नेले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
KBC 17 मध्ये चमकला बिहारचा मिथिलेश कुमार, 'या' प्रश्नाचं उत्तर देत जिंकले 25 लाख, पण 50 लाखांचं उत्तर देता केली चुक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement