Kitchen Jugaad Video : टिकल्यांच्या पाकिटांची कमाल, 5 मिनिटात उंदीर घरातून गायब होतील

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : तुम्ही कधी टिकल्यांची पाकिटं वापरून उंदरांना पळवलं आहे का? एका गृहिणीने या जबरदस्त जुगाडाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

News18
News18
मुंबई : घरात उंदीर झाले की त्यांचा त्रास सर्वात मोठा असतो. काहीही चुकून उघडं राहिलं तर त्यात हे जातात. काही खाण्याचा पदार्थ असेल तर त्याची वाट लावतात. अगदी धान्य- कडधान्यंही सोडत नाही. मग या उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी काय काय उपाय केले जातात. अशाच एका उपायाचा किचन जुगाड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
उंदरांना पकडण्यासाठी किंवा घरातून पळवण्यासाठी बाजारात बरंच काय काय उपलब्ध आहे. पिंजरा, औषध, गोळ्या, बोर्ड आणि काय काय. पण तुम्ही कधी टिकल्यांची पाकिटं वापरून उंदरांना पळवलं आहे का? एका गृहिणीने या जबरदस्त जुगाडाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
उंदीर पळवण्याचे काही उपाय फेल ठरतात. तर काही घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे हा उपाय नक्कीच फायद्याचा ठरणारा असा आहे.
तुम्हाला करायचं काय आहे, तर एका भांड्यात थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात देशी तूप, मसाला आणि कोणताही सिरप टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. सिरप एक्सपायर असेल तर अधिकच चांगलं.आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करा. जिथून उंदीर येतात किंवा जिथे उंदीर फिरतात तिथे हे गोळे ठेवा.
advertisement
दुसरी पद्धत म्हणजे टिकल्यांची रिकामी पाकिटं घ्या त्यावर हे पीठ चिकटवा. आता हे पाकीट तुम्ही तुम्हाला हवं तिथे अगदी कपाटातही ठेवू शकता.
advertisement
हे पीठ खाल्ल्यावर उंदीर पळून जातील असा दावा या महिलेने व्हिडिओ मध्ये केला आहे. Indian Vlogger Pinki युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना : हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीने फक्त माहितीसाठी दिला आहे.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : टिकल्यांच्या पाकिटांची कमाल, 5 मिनिटात उंदीर घरातून गायब होतील
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement