वीट भट्टीतली राख काढायला गेला आणि समोर आला मृत्यू, तरुण-बिबट्याच्या झटापटीचा थरारक Video Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका युवकाची बिबट्यासोबत थरारक झटापट झाली आणि त्याने केवळ धैर्याने नव्हे, तर प्रसंगावधानाने आपला जीव वाचवला.
मुंबई : देशभरात वन्यप्राण्यांचे मानवी वस्त्यांमध्ये येणं ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे झपाट्यानं कापलं जाणारं जंगल यामुळे अनेक वेळा वाघ, बिबट्या, अस्वल किंवा बिबट्यासारखे हिंस्र प्राणी थेट माणसांच्या वस्त्यांमध्ये येतात.
अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडली, जिथे एका युवकाची बिबट्यासोबत थरारक झटापट झाली आणि त्याने केवळ धैर्याने नव्हे, तर प्रसंगावधानाने आपला जीव वाचवला.
ही घटना धौरहरा वन रेंजमधील एका विटभट्टीवर काम करणाऱ्या व्यक्तीची आहे. मंगळवारी दुपारी काही मजूर नेहमीप्रमाणे भट्टीवर काम करत होते. त्याचवेळी एक युवक राख काढण्यासाठी भट्टीवर गेला होता. तो राख काढत असतानाच अचानक एक बिबट्या तिथे हजर झाला आणि त्याने युवकावर झडप घातली.
advertisement
हल्ल्याने जखमी झालेला युवक घाबरला नाही, उलट त्याने हिम्मत दाखवत बिबट्याला दाबून धरलं. ही झटापट काही वेळ चालली. त्याचवेळी इतर मजूरांनी हे दृश्य पाहून वरून बिबट्यावर वीटा आणि दगड फेकायला सुरुवात केली. शेवटी घाबरून बिबट्यानं तिथून पळून गेला. मात्र पळता-पळता त्याने चार जणांना जखमी केलं.
ही थरारक झटापट तिथे उपस्थित असणाऱ्या कुणीतरी मोबाईलमध्ये शूट केली आणि सोशल मीडियावर टाकली. काही क्षणांतच व्हिडिओ व्हायरल झाला आणि वन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई सुरु केली. वन विभागाच्या पथकाने त्या बिबट्याला पकडून जंगलात सोडलं आहे.
advertisement
Leopard Attacks Brick Kiln Workers in Lakhimpur Kheri; Man Fights Off Beast, Several Injured
In Lakhimpur Kheri district, a leopard attacked labourers working at a brick kiln.
A 35-year-old man named Mihilal managed to overpower the leopard and brought it down.
A fierce… pic.twitter.com/LaWX15rYcB
— Atulkrishan (@iAtulKrishan1) June 24, 2025
advertisement
लखीमपूर खीरीच्याच शारदा नगर वन रेंजमधील जटपुरवा गावाजवळच्या मुख्य रस्त्यावर बिबट्या मोकळेपणे फिरताना दिसला. त्याला पाहून नागरिकांची धांदल उडाली. वाहने थांबली, लोक जागच्या जागी थबकले. काही जणांनी तेंदुआचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला गेला.
व्हिडिओ व्हायरल होताच वन विभागाने त्या भागात शोधमोहीम सुरु केली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 10:25 PM IST
मराठी बातम्या/Viral/
वीट भट्टीतली राख काढायला गेला आणि समोर आला मृत्यू, तरुण-बिबट्याच्या झटापटीचा थरारक Video Viral