Video : तेच डोळे, तोच रंग, तिच निरागसता; कुंभ मेळ्यात मोनालिसानंतर आता बहिणीची एन्ट्री, सांगा कोण जास्त सुंदर?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता सोशल मीडियावर मोनालिसा आणि तिच्या बहिणीचा फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. खरंतर लोक मोनालिसाची बहिण इशिकाला मोनालिसा समजून तिच्या मागे लागले होते.
मुंबई : कुंभमेळात नेहमीच चर्चेत असतात ते तिथले साधू आणि त्यांची अद्भुत विद्या पण यावेळी फक्त कुंभ मेळाच नाही तर संपूर्ण देशाच एका १६ वर्षांची तरुणी खुपच प्रसिद्ध झाली.
घारे डोळे, काळे केस, सावळा रंग आणि निरागसता यामुळे लोकांना जणू तिच्या सैंदर्याची भुरळ पडली. या तरुणीचं नाव मोनालिसा असल्याचं सांगितलं जातंय. मोनालिसासोबत एक फोटो घेण्यासाठी कुंभमेळ्यात तिला शोधत आहेत आणि गर्दी करत आहेत.
माहितीनुसार मोनालिसाही 16 वर्षांची आहे आणि तिचं संपूर्ण नाव मोनालिसा भोसले आहे. ती मुळची इंदूरची आहे. कुंभमेळ्यात ती रुद्राक्षाचे हार विकण्यासाठी आली होती. पण त्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली आणि ती देशभरात चर्चेत आली.
advertisement
पण आता मोनालिसाच नाही तर तिची बहिण देखील चर्चे आली आहे. मोनालिसाप्रमाणेच तिची बहिण देखील हुबेहुब दिसते. तसेच डोळे, तोच रंग, तिच निरागसता. ज्यामुळे त्या दोघीही एकसारख्या दिसत आहेत.
आता सोशल मीडियावर मोनालिसा आणि तिच्या बहिणीचा फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. खरंतर लोक मोनालिसाची बहिण इशिकाला मोनालिसा समजून तिच्या मागे लागले होते. पण नंतर ती मोनालिसा नसून इशिका असल्याचं समोर आलं.
advertisement
प्रयागराजच्या महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसलेने तिची बहीण शिखासोबत एका व्हिडिओमध्ये सत्य सांगितले. या व्हिडिओमध्ये मोनालिसा आणि इशिका दोघांनी सांगितले की, लोक अनेकदा शिखाला मोनालिसा मानतात.
या 25 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये इशिका म्हणते की, मी जेव्हाही हार विकायला जाते तेव्हा लोक मला मोनालिसा समजतात. पण मी तिची बहीण आहे, मी मोनालिसाच्या काकाची मुलगी आहे.
advertisement
हा व्हिडिओ X वर @MonalisaIndb नावाच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले - माझी बहीण शिखा आणि मी एकसारखे दिसतो, तुम्हाला काय वाटते?
मेरी बहन शिखा और मैं एक जैसे ही दिखते हैं, आपको क्या लगता है? pic.twitter.com/e9iSCL58HC
— Monalisa Bhosle (@MonalisaIndb) January 19, 2025
advertisement
ही क्लिप आता झपाट्याने व्हायरल झाली आणि आतापर्यंत ती 3.5 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. व्हिडिओला साडेतीन हजारांहून अधिक लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, तू आणि तुझी बहीण दोघेही खूप सुंदर आहेत. सोशल मीडियावर तर लोक मोनालिसाचे फोटो-व्हिडीओ एकमेकांना शेअर करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 22, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : तेच डोळे, तोच रंग, तिच निरागसता; कुंभ मेळ्यात मोनालिसानंतर आता बहिणीची एन्ट्री, सांगा कोण जास्त सुंदर?