30 तास ताठ राहायचं पेनिस, ऑपरेशननंतर झालं भलतंच! नवऱ्याला 43 लाख, बायकोला 4 लाख

Last Updated:

Man 30 hour erection : शारीरिक संबंधाची इच्छा नसतानाही या व्यक्तीचं पेनिस ताठ होत होतं. त्यावर उपचार करायला गेला आणि त्याच्या उलटच घडलं.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
माद्रिद : असे काही लोक आहेत, ज्यांना लैंगिक समस्या असतात. अशीच लैंगिक समस्या असलेली एक  व्यक्ती. या व्यक्तीला पेनिसचा प्रॉब्लेम होता. यावर उपचार करण्यासाठी म्हणून ही व्यक्ती डॉक्टरांकडे गेली. पण उपचार करताना भलतंच घडलं. यासाठी त्या व्यक्तीला 43 लाख तर त्याच्या बायकोला 4 लाख रुपये मिळाले आहेत.
स्पेनमधील हे प्रकरण आहे. अलबैदामध्ये राहणारी ही व्यक्ती. या व्यक्तीची समस्या अशी की त्या व्यक्तीचं पेनिस ताठ होत होतं. सामान्यपणे शारीरिक संबंधाची इच्छा झाली ही असं होतं. पण या व्यक्तीला शारीरिक संबंधाची इच्छा नसतानाही त्याचं पेनिस ताठ होत होतं. तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. तब्बल 30 तास या व्यक्तीचं पेनिस ताठ राहिलं. शेवटी या व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
advertisement
रुग्णालयात गेल्यावर या व्यक्तीवर उपचारात डॉक्टरांनी उशीर गेला. त्यानंतर 20 तास उलटले तरी काही सुधारणा दिसली नाही. ही व्यक्ती पत्नीसह पुन्हा रुग्णालयात गेली. तिथं युरोलॉजिस्टला दाखवावं लागेल, असं सांगितलं, त्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार होती. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं.
advertisement
दुसऱ्या रुग्णालयात गेल्यानंतर या व्यक्तीला ताप आला. या व्यक्तीला priapism झाल्याचं निदान झालं. या समस्येत कोणत्याही लैंगिक इच्छेशिवाय लिंग ताठ राहतं. डॉक्टरांनी त्याच्या पेनिसमधून रक्त काढलं आणि जसा त्याचा ताप उतरला त्याला डिस्चार्ज दिला. काही दिवसांनंतर त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. ज्यामध्ये त्याच्या पेनिसमध्ये एक डिव्हाइस टाकण्यात आलं. पण सर्जरीच्या काही दिवसांनंतर हे डिव्हाइस बाहेर आलं. त्यामुळे व्यक्तीला दुसरं ऑपरेशन करावं लागलं.
advertisement
पण याचा परिणाम असा ही या व्यक्तीला परमनंट इरेक्टाइल डिस्फंक्शन झालं. म्हणजे त्याचं पेनिस कधीच ताठ होऊ शकत नाही. त्याच्या डाव्या हातातील संवेदना आणि शक्तीही त्याने गमावली. डाव्या पायात वेदना होऊ लागला.
advertisement
दरम्यान या प्रकरणानंतर सरकारने या कपलला भरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानुसार व्यक्तीला जवळपास 43 लाख तर त्याच्या बायकोला 4 लाखांची भरपाई मिळेल, असं वृत्त द सनने दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
30 तास ताठ राहायचं पेनिस, ऑपरेशननंतर झालं भलतंच! नवऱ्याला 43 लाख, बायकोला 4 लाख
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement