परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी आता No Tension, किंमत आणि सर्विसबद्दल जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिक टपाल विभागाची परदेशात दिवाळी फराळ पाठवण्याची सुविधा, परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांनाही मिळणार घरचा फराळ
कुणाल दंडगव्हाळ - प्रतिनिधी नाशिक :
परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी आता No Tension, किंमत आणि सर्विसबद्दल जाणून घ्या
मुंबई : दिवाळी म्हटलं की फराळ आणि आनंद या दोन गोष्टींचं अतूट नातं आहे. भारतात विविध चविष्ट फराळाचे पदार्थ लाडू, चकली, करंजी, चिवडा यांच्यासह घराघरात सजलेले दिसतात. परंतु परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना हे चविष्ट फराळाचे पदार्थ सहज उपलब्ध होत नाहीत. याच गोष्टीचा विचार करून नाशिक टपाल विभागाने परदेशातील भारतीयांसाठी विशेष फराळ सेवा सुरू केली आहे.
advertisement
आता नाशिकमधील नागरिकांना घरच्या फराळाच्या चवीचा आनंद परदेशात राहणाऱ्या प्रियजनांना माफक दरात आणि सुरक्षित पॅकिंग करून पोस्टाद्वारे पाठवता येणार आहे. पराग चांदवडकर, विपणन कार्यकारी, जीपीओ टपाल अधिकारी यांनी सांगितले की, "परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने ही सेवा सुरू केली आहे."
परदेशी पाठवण्याची सुविधा आणि दर:
नाशिक पोस्ट ऑफिसने नागरिकांसाठी 120 हून अधिक देशांमध्ये 1 किलो ते 35 किलोपर्यंत फराळ पाठवण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
advertisement
दररोज 10 ते 15 पार्सल बुक केले जात आहेत, आणि नागरिकांकडून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिका - एअर पार्सल 1 किलोसाठी 1746 रुपये आणि स्पीड पोस्ट 2678 रुपये
यूके - एअर पार्सल 1 किलोसाठी 2177 रुपये आणि स्पीड पोस्ट 2637 रुपये
युएसई - एअर पार्सल 955 रुपये तर स्पीड पोस्ट 1793 रुपये
advertisement
सणासुदीला परदेशात आपल्या प्रियजनांना फराळ पाठवण्याच्या या सुविधेमुळे, पोस्ट ऑफिसच्या शाखांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः नाशिककरांना परदेशात राहणाऱ्या कुटुंबीयांना पारंपारिक चवींचा फराळ पाठवून दिवाळी सण अधिक आनंदाने साजरा करता येणार आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 25, 2024 9:39 PM IST
मराठी बातम्या/Viral/
परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना फराळ पाठवण्यासाठी आता No Tension, किंमत आणि सर्विसबद्दल जाणून घ्या

