ही खरी 'Krish', नर्सने ड्युटी बजावण्यासाठी वाहत्या पाण्यातून मारल्या उड्या, अंगावर काटा आणणारा Video Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका महिला नर्सने जीवाची पर्वा न करता उफाणलेल्या नाल्यावरून थेट उडी मारत ड्युटीला हजेरी लावली.
मुंबई : हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नद्या-नाले तुफानी वेगाने वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अशाच वेळी मंडी जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारणही तसंच आहे. एका महिला नर्सने जीवाची पर्वा न करता उफाणलेल्या नाल्यावरून थेट उडी मारत ड्युटीला हजेरी लावली.
हा प्रसंग मंडी जिल्ह्यातील चौहार घाटीतील सुधार पंचायत परिसरातील आहे. टिककर गावातील स्टाफ नर्स कमला देवी शुक्रवारी सकाळी हुरंग नारायण देवता गावात लसीकरणासाठी निघाल्या होत्या. मात्र, याच मार्गावर शिल्हबुधानी पंचायत परिसरात काही दिवसांपूर्वी ढगफुटीमुळे आलेल्या पुरात सर्व पादचारी पूल वाहून गेले होते. त्यामुळे स्थानिकांना रस्ता पार करणे कठीण झाले होते.
advertisement
तरीही कमला देवी यांनी आपल्या जबाबदारीला प्राधान्य देत प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नाल्यावरून उडी घेतली आणि रस्ता पार केला. त्या क्षणी त्यांचा पाय घसरला असता तर त्या पाण्याच्या एवढ्या मोठ्या प्रवासात नक्कीच वाहून गेल्या असत्या, पण त्यांनी धैर्य दाखवत नाला पार केला आणि गावात पोहोचून लसीकरणाची जबाबदारी पार पाडली.
Such people truly need appreciation! 🙌 From Chauharghati Mandi HP, Kamla Devi, a health worker, crossed a flooded stream by jumping to reach Hurang village and vaccinate babies. With roads blocked due to floods and landslides, she carried duty on her shoulders. pic.twitter.com/FbysmHKqOB
— Nikhil saini (@iNikhilsaini) August 22, 2025
advertisement
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक त्यांच्या जिद्दीला आणि सेवाभावाला सलाम करत आहेत. अनेकांनी तर हा प्रसंग पाहून ऋतिक रोशनच्या ‘क्रिश’ चित्रपटातील एक सीन आठवल्याचं म्हटलं आहे. कमला देवींनाही काहींनी क्रिश म्हटलं आहे. कारण ते खरंच एका सुपर हिरोप्रमाणे आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 7:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
ही खरी 'Krish', नर्सने ड्युटी बजावण्यासाठी वाहत्या पाण्यातून मारल्या उड्या, अंगावर काटा आणणारा Video Viral


