सुहागरात्रीलाच नववरीला आली चक्कर, नवरदेवाने मदतीऐवजी आणली 'प्रेग्नन्सी किट', पुढे जे घडलं ते...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात लग्नाच्या पहिल्याच रात्री एक धक्कादायक घटना घडली. नववधूला लग्नाच्या थकव्यामुळे, उष्णता आणि आर्द्रतेमुळे चक्कर आली. नवरदेवाने मदत करण्याऐवजी...
लग्नाच्या पहिल्या रात्री बंद खोलीत नवरीला अचानक चक्कर आली. यावर नवरदेवाने चक्क प्रेग्नसी किट आणून दिली आणि टेस्ट केली, तर पुढे जे घडलं ते धक्कादायक होते. ही घटना उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात घडली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, ते जाणून घेऊया...
खरं तर, रामपूरमध्ये शनिवारी एका तरुणाचे लग्न झाले. लग्नाची वरात परतल्यानंतर, वधू संध्याकाळी तिच्या सासरच्या घरी पोहोचली. वधूचे पूर्ण विधीपूर्वक स्वागत करण्यात आले. मात्र, या वेळी खूप उष्णता होती. वधू-वर लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी खोलीत गेले. दरम्यान, नवरीला चक्कर आली. नवरीला बेशुद्ध पाहून, मदत करण्याऐवजी नवरदेवाने गावातील मेडिकल स्टोअरमधून प्रेग्नन्सी टेस्ट किट विकत आणली आणि ती आपल्याजवळ ठेवली. यावर नवरीला राग आला.
advertisement
कुटुंबीय पोहोचले
लग्नाच्या रात्री, पतीने नवरीला किट देऊन टेस्ट करण्यास सांगितल्यावर तिला राग आला. तिने तात्काळ आपल्या नणंदेला फोन केला आणि सांगितले की, तिचा नवरा तिच्यावर संशय घेत आहे आणि ती नक्कीच कोणासोबत तरी प्रेमसंबंधात होती असे म्हणत आहे. नणंदेने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि कुटुंबियांना संपूर्ण माहिती दिली. थोड्याच वेळात नवरीचे आई-वडीलही तिच्या सासरच्या घरी पोहोचले.
advertisement
तिला चक्कर का आली होती?
लग्नातील थकवा, उष्णता आणि दमटपणामुळे नवरीला चक्कर आली होती. हे पाहून नवरदेव घाबरला. त्याने तात्काळ काही मित्रांशी संपर्क साधला, ज्यांनी त्याला मस्करीत सांगितले की हे गर्भधारणेचे लक्षण असू शकते. याच गोंधळात नवरदेवाने त्याच रात्री प्रेग्नन्सी टेस्ट किट विकत घेतली.
पंचायतीत निर्णय झाला
मुलगी सासरच्या घरी पोहोचताच, त्यांनी नवरदेवाच्या कुटुंबासोबत भांडण सुरू केले. प्रकरण अधिक बिघडण्यापूर्वी, गावातील काही लोकांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही पक्षांना समजावले. गावात एक पंचायत बोलावण्यात आली, जी सुमारे दोन तास चालली. शेवटी, नवरदेवाने आपली चूक मान्य केली आणि नवरीची आणि तिच्या कुटुंबाची माफी मागितली. त्याने पंचायतीत जाहीरपणे सांगितले की, तो भविष्यात असे वागणार नाही.
advertisement
हे ही वाचा : मध्यरात्री आला व्हिडीओ काॅल, महिलेने केला रिसीव्ह, अनोळखी मुलगा दाखवू लागला गुप्तांग, पुढे जे झालं...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/Viral/
सुहागरात्रीलाच नववरीला आली चक्कर, नवरदेवाने मदतीऐवजी आणली 'प्रेग्नन्सी किट', पुढे जे घडलं ते...