प्रेमानंद आणि रामभद्राचार्य महाराज यांच्यातील भांडणामध्ये पडला बाल कथावाचक अभिनव; म्हणाला, 'मला प्रेमानंद महाराजांमध्ये....'

Last Updated:

पुढे बोलताना त्यांने संतांवर टीका करणे म्हणजे पाप असल्याचे विधान केलं. यामुळे त्यांचा इशारा कुठे होता हे लोक सहज ओळखू लागले.

News18
News18
मुंबई : भारतातील संतसमाजामध्ये एखाद्या वक्तव्यवरुन नेहमीच लहान-मोठा वाद होत असतो. कधी एखाद्या संतांचे शब्द ट्रेंड होतात. तर कधी एखाद्याचं वक्तव्य कॉन्ट्रोवर्सी होतं. जगद्गुरु रामभद्राचार्यजी महाराजांनी पूज्य प्रेमानंद महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अनेक संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वादात आता बालकथावाचक अभिनव अरोडाही उतरले आहेत.
न्यूज 18 शी बोलताना अभिनव अरोडाने सांगितलं की, संतांमध्ये मतभेद होऊ नयेत. त्याने नम्रपणे म्हटले की, “मी कोणत्याही संतावर, विशेषतः इतक्या मोठ्या महासंतांवर टिप्पणी करण्याइतका मोठा नाही. माझ्या दृष्टीने रामभद्राचार्यजी महाराज असोत किंवा प्रेमानंद महाराज दोघेही महान संत आहेत, ते चालते-फिरते तीर्थ आहेत.”
पुढे बोलताना त्यांने संतांवर टीका करणे म्हणजे पाप असल्याचे विधान केलं. यामुळे त्यांचा इशारा कुठे होता हे लोक सहज ओळखू लागले.
advertisement
अभिनव अरोडाने सांगितले “मला रामभद्राचार्यजींमध्ये प्रभु श्रीरामांचे आणि प्रेमानंद महाराजांमध्ये माझ्या किशोरीजींचे दर्शन घडते. मी दोघांनाही नतमस्तक होऊन प्रणाम करतो. संत हे स्वभावतः मतवाले असतात, पण मनात कधीही द्वेष नसतो.”
त्यांने पुढे सांगितलं की, एका वेळी महाराजांनी त्यांना ओरडलं आहे, पण त्यातूनही त्यांना प्रेम आणि करुणेचीच अनुभूती झाली. “अजून काही दिवसांपूर्वी त्यांनी मला सांगितले की तू माझ्या नातव्यासारखा आहेस. लाडूही दिला. मला ओरडले तरी ते प्रेमानेच.”
advertisement
अभिनवने पुढे विनंती केली की, “संतांची निंदा का करायची? आपण एखाद्या महासंताबद्दल चुकीचे बोललो, तर त्या पापाचे भागीदार होऊ. प्रेमानंद महाराज हे साक्षात किशोरीजींचे स्वरूप आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी वाईट बोलणे टाळावे.”
काही दिवसांपूर्वी एका यूट्यूबरने जगद्गुरु रामभद्राचार्यजींचा इंटरव्ह्यू अपलोड केला होता. त्यात त्यांना विचारण्यात आले “प्रेमानंद महाराजांच्या चमत्कारांविषयी आपले मत काय आहे?”
advertisement
त्यावर रामभद्राचार्यजी म्हणाले की, “प्रेमानंद महाराज हे ना विद्वान आहेत, ना चमत्कारी आहेत. ते एक बालकासारखे संत आहेत.” त्यांनी आव्हानही दिले की, “जर त्यांच्यात क्षमता असेल तर त्यांनी संस्कृतमधील एक अक्षर किंवा श्लोकाचा अर्थ समजावून दाखवावा.”
हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. काहींनी रामभद्राचार्यजींना अहंकारी म्हटले, तर काहींनी प्रेमानंद महाराजांच्या स्तुतीचा वर्षाव केला. या वादातून एक गोष्ट स्पष्ट झाली की संतांविषयी समाजात अपार श्रद्धा आहे, मात्र संतांमध्ये निर्माण झालेले मतभेद भक्तांमध्ये गोंधळ निर्माण करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्रेमानंद आणि रामभद्राचार्य महाराज यांच्यातील भांडणामध्ये पडला बाल कथावाचक अभिनव; म्हणाला, 'मला प्रेमानंद महाराजांमध्ये....'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement