Snapchat आणि Instagram मध्ये काय फरक? तरुण पिढी स्नॅपचॅटला का पसंत करते, 'या' गोष्टी ऐकून Shock बसेल

Last Updated:

अनेकाना अजूनही वाटतंय की Snapchat हे फक्त फोटो काढताना फिल्टर लावण्यासाठी वापरले जाते. पण असं नाही खरंतर Snapchat ज्या कारणासाठी आणलं गेलं आणि त्याचा वापर हा थोडा शॉगिंक आहे. चला मग स्नॅपचाट हे इन्स्टाग्राम आणि टिकटॉकपेक्षा कसं वेगळं आहे आणि त्याची खास गोष्ट काय आहे, ते पाहूया.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. इन्स्टाग्राम (Instagram) आणि टिकटॉक (TikTok) यांनी तर जगभरातील अब्जावधी लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. त्यामुळे आता लोकांचा असा एकही दिवस जात नाही ज्यामध्ये त्यांनी फोनमध्ये हे ऍप उघडून पाहिले नाहीत. हल्ली जवळजवळ सगळेच इंस्टाग्राम वापरतात. पण तुम्हा माहितीय का की Snapchat ला आजही अनेक तरुण पिढी पसंत करते. पण असं का माहितीय?
अनेकाना अजूनही वाटतंय की Snapchat हे फक्त फोटो काढताना फिल्टर लावण्यासाठी वापरले जाते. पण असं नाही खरंतर Snapchat ज्या कारणासाठी आणलं गेलं आणि त्याचा वापर हा थोडा शॉगिंक आहे. चला मग स्नॅपचाट हे इन्स्टाग्राम आणि टिकटॉकपेक्षा कसं वेगळं आहे आणि त्याची खास गोष्ट काय आहे, ते पाहूया.
इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर कंटेंट (Content) कायमस्वरूपी राहतो जोपर्यंत तुम्ही तो डिलीट करत नाही. पण, स्नॅपचॅटची सर्वात मोठी ओळख आहे 'अदृश्य होणारे मेसेजेस आणि स्टोरीज' (Disappearing Messages and Stories). तुम्ही पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर ठराविक वेळेत आपोआप डिलीट होतात.
advertisement
यामुळे वापरकर्त्यांना कोणताही विचार न करता, क्षणातील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. तसेच इथे 'परफेक्ट दिसण्याची' किंवा 'जास्त लाईक्स मिळवण्याची' चिंता नसते. तसेच लाईक्सवरुन कोणी जज देखील करणार नाही. शिवाय तुम्ही आयुष्यात काय करताय, ते तुम्ही इथे शेअर करु शकता. Snapchat वर तुम्ही अगदी काहीही शेअर करु शकता. तिथे कोणीही तुम्हाला जज करणार नाही, ना तिथे कोणत्याही एस्थेटिकची गरज आहे.
advertisement
इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक गोष्ट 'सार्वजनिक' असते. स्नॅपचॅट मात्र मित्रांच्या छोट्या ग्रुपमध्ये वैयक्तिक (Private) आणि अधिक मोकळा संवाद साधण्याची संधी देते.
स्नॅपचॅटनेच ऑगमेंटेड रिॲलिटी (Augmented Reality - AR) फिल्टर्सचा ट्रेंड सुरू केला. विविध प्रकारचे मजेदार लॅन्सेस (Lenses), फेस फिल्टर्स आणि AR इफेक्ट्स हे स्नॅपचॅटचे वैशिष्ट्य आहे. ज्यासाठी ते मुळता ओळखले जाते.
advertisement
इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरही AR फिल्टर्स आहेत, पण स्नॅपचॅटचे AR तंत्रज्ञान अधिक विकसित आणि वैविध्यपूर्ण आहे. हे वापरकर्त्यांना सतत नवनवीन आणि आकर्षक अनुभव देते. केवळ फोटो किंवा व्हिडिओ सुंदर दिसण्यापेक्षा, ते अधिक मनोरंजक कसे बनवता येतील यावर स्नॅपचॅटचा भर असतो.
स्नॅपचॅट फक्त अदृश्य कंटेंटपुरते मर्यादित नाही, तर ते काही युनिक फीचर्सही देते.
advertisement
Snap Map: हे फीचर मित्रांचे लाइव्ह लोकेशन (Live Location) दाखवते, ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटणे किंवा ते काय करत आहेत हे समजणे सोपे होते. तरुण पिढीसाठी हे एक मजेदार आणि सोयीस्कर फीचर आहे.
हे एक चॅटबॉट (Chatbot) फीचर आहे, जे वापरकर्त्यांना विविध प्रश्नांची उत्तरे देण्यास आणि कल्पना सुचवण्यास मदत करते. हे पर्सनल असिस्टंटसारखे (Personal Assistant) काम करते.
advertisement
लहान गट आणि 'खऱ्या' मित्रांवर भर
इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर 'फॉलोअर्स' (Followers) आणि 'लाइक' (Likes) मिळवण्यावर जास्त लक्ष असते. स्नॅपचॅट मात्र मित्र आणि कुटुंबातील अगदी जवळच्या लोकांशी संवाद साधण्यावर भर देते. येथे 'खऱ्या' जीवनातील क्षण शेअर केले जातात, जे इन्स्टाग्रामच्या 'परफेक्ट' जीवनापेक्षा वेगळे असतात.
थोडक्यात सांगायचे तर, स्नॅपचॅट क्षणिकता, खेळकर AR अनुभव आणि 'वास्तविक मित्र वर्तुळाशी असलेला संवाद' या वैशिष्ट्यांमुळे आजही तरुण पिढीमध्ये लोकप्रिय आहे. इन्स्टाग्राम आणि टिकटॉक हे प्रसिद्धीसाठी तर स्नॅपचॅट हे वास्तविक कनेक्शनसाठी अधिक महत्त्वाचे ठरते.
advertisement
यातील शॉकिंग गोष्ट अशी की खरंतर स्नॅपचार्ट सारख्या ऍपची आपल्याला सोशल मीडिया ऍपम्हणून गरज आहे. कारण हे ऍप सोशल मीडियाचं इतर ऍप्स सारखं ऍडिक्शन लावत नाही आणि फोमो सारखे एन्झायटी ही होत नाही. कोणाला कुठेही चमकायचं नसतं आणि लाइक आणि फॉलेच्या रेसमध्ये पळायचं नसतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Snapchat आणि Instagram मध्ये काय फरक? तरुण पिढी स्नॅपचॅटला का पसंत करते, 'या' गोष्टी ऐकून Shock बसेल
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement