advertisement

Ajab Gajab : महिलेनं आपल्याच बेस्ट फ्रेंडला घेतलं दत्तक, कारणही आहे खास!

Last Updated:

अनेक अनाथ मुलांना लोक दत्तक घेतात. त्यांचं संगोपन करुन त्यांना शिकवतात आणि मोठं करतात. तुम्ही दत्तक घेण्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील मात्र कधी आपल्या मित्रालाच दत्तक घेतल्याविषयी ऐकलंय का? एका महिलेनं चक्क आपल्याच बेस्टफेंडला दत्तक घेतलं.

महिलेनं आपल्याच बेस्ट फ्रेंडला घेतलं दत्तक
महिलेनं आपल्याच बेस्ट फ्रेंडला घेतलं दत्तक
नवी दिल्ली, 20 डिसेंबर : अनेक अनाथ मुलांना लोक दत्तक घेतात. त्यांचं संगोपन करुन त्यांना शिकवतात आणि मोठं करतात. तुम्ही दत्तक घेण्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील मात्र कधी आपल्या मित्रालाच दत्तक घेतल्याविषयी ऐकलंय का? एका महिलेनं चक्क आपल्याच बेस्टफेंडला दत्तक घेतलं. ही घटना समोर येताच सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की, महिलेनं असं का केलं? यामागे काय कारणं आहे आणि महिलेनं असा निर्णय का घेतला याविषयी जाणून घेऊया.
बेस्ट फेंडला दत्तक घेण्याची समोर आलेली घटना दक्षिण कोरियाची आहे. एका महिलेनं आपल्या बेस्ट फेंडला कायदेशीररित्या दत्तक घेतलं आणि आई बनली. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असून चांगलंच चर्चेत आलंय.
ऑडिटी सेंट्रल या वेबसाइटनुसार, 44 वर्षीय Eun Seo-ran एका पुराणमतवादी दक्षिण कोरियाच्या पितृसत्ताक कुटुंबात वाढली. ज्यामध्ये तिचे वडील कमावणारे होते आणि तिची आई एक गृहिणी होती. तिच्या पतीसोबत, ती देखील संपूर्ण कुटुंबाची सेवा करायची. युन म्हणते की तिच्या आईने आयुष्यभर तिच्या पतीची सेवा केली, परंतु त्यांच्याकडून तिला कधीही सन्मान मिळाला नाही. तिनं युनला तिच्या मार्गावर जाऊ दिलं नाही. युन लहान असताना, तिच्या आईनं तिला कधीही स्वयंपाकघरात जाऊ दिलं नाही आणि नेहमीच तिला स्वतंत्र स्त्री होण्यासाठी प्रोत्साहित केलं.
advertisement
युननं आपल्या आईसारखं आपलं आयुष्य कधीही वाया घालवणार नाही अशी शपथ घेतली आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ती अजूनही मानते की तिच्यासाठी लग्न करणं बेजबाबदारपणाचं असेल. रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये, ती शहरी तणावापासून दूर निसर्गाच्या जवळ एका गावात गेली. जिथे तिची भेट ली इओ-रीशी झाली. ती देखील तिच्यासारख्या विचारांची स्त्री होती. अशा परिस्थितीत अल्पावधीतच दोघेही चांगले मित्र बनले आणि वर्षभरातच दोघेही एकत्र राहू लागले.
advertisement
दोघींनी एका कुटुंबासारखं एकत्र राहण्याचं ठरवलं. मात्र एके दिवशी युनला तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार घरातील कोणी व्यक्तीच पेशंटविषयी निर्णय घेऊ शकते आणि तेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊ शकतात. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या वैद्यकीय कागदपत्रांवर सही करणं, आपल्यापैकी एक आजारी पडल्यावर त्याची काळजी घेण्यासाठी कामातून वेळ काढणं या सर्वांसाठी त्यांनी लग्न करायचं ठरवलं. मात्र दक्षिण कोरिया समलिंगी विवाहाला मान्यता देत नाही. मग त्यांनी मित्राला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Ajab Gajab : महिलेनं आपल्याच बेस्ट फ्रेंडला घेतलं दत्तक, कारणही आहे खास!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement