दुचाकीला बसवले ट्रॅक्टरचे टायर, व्यक्तीचा जुगाडू Video पाहून माराल डोक्यावर हात
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
भारतीयांचा जुगाड करण्यात कोणीही हात पकडू शकत नाही. कोणी विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोक बनवतात आणि सर्वांना चकित करतात.
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : भारतीयांचा जुगाड करण्यात कोणीही हात पकडू शकत नाही. कोणी विचारही करु शकत नाही अशा गोष्टी लोक बनवतात आणि सर्वांना चकित करतात. असे जुगाडू लोक आणि त्यांचे जुगाड कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. असाच एक जुगाडू व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्यक्तीचा हा जुगाड पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. हा जुगाड नेमका आहे तरी काय? याविषयी जाणून घेऊया.
तुम्ही अनेक निरनिराळ्या प्रकारच्या गाड्या पाहिल्या असतील. प्रत्येक गाडीला वेगवेगळ्या कंपनीचे टायर असतात. मात्र कधी एखाद्या दुचाकीला ट्रॅक्टरचे टायर पाहिलेत का? एका व्यक्तीने जुगाड करत दुचाकीला ट्रॅक्टरचे टायर बसवले आहेत. ही गाडी पाहिल्यावरच तुम्ही चकित व्हाल.
समोर आलेल्या जुगाडू व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती दुचाकी चालवत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गाडी समोर नॉर्मल आहे मात्र गाडीचे मागचे टायर ट्रॅक्टरचे बसवले आहेत. व्यक्तीने रॉडच्या सहाय्याने ट्रॅक्टरचे टायर गाडीला बसवले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांनी डोक्याला हात लावलाय. असा जुगाड कोण करतं म्हणत लोक व्यक्तीला ट्रोल करत आहेत.
advertisement
CRACK MIND नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत.
advertisement
दरम्यान, सोशल मीडियावर असे देसी जुगाड खूप पहायला मिळतात. यातील काही काही जुगाड फायदेशीर असतात तर काही उगीच काहीतरी विचित्र प्रकार पहायला मिळतो. प्रसिद्धी साठी काही लोक असे जुगाड करत असतात. यातील काहीच व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 17, 2023 1:22 PM IST









