झोपडीतून येत होता ओरडण्याचा आवाज; दृश्य पाहताच शेजाऱ्यांच्या अंगावर काटा, आत 4 चिमुकल्या...
- Published by:Priya Lad
Last Updated:
झोपडीत असलेल्या 5-6 वर्षांच्या या 4 चिमुकल्या त्यांना भयानक अवस्थेत दिसल्या.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या नावादा बिलसंडी भागातील एका झोपडीतून अचानक आवाज आला. तसे शेजारी आपल्या घराबाहेर पडले. त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. चार चिमुकल्या त्यांना भयानक अवस्थेत दिसल्या. 5-6 वर्षांच्या या चिमुकल्या. नेमकं त्यांच्यासोबत घडलं काय पाहुयात.
शुक्रवारची घटना. बिलसंडी गावातील एका झोपडीतून ओरडण्याचा आवाज आला. चिमुकल्या मुलींचा हा आवाज. आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातील लोक धावत आले. समोर जे दिसलं ते पाहून त्यांना धक्का बसला. त्या झोपडीला आग लागली होती. या आगीच्या विळख्यात चार मुली सापडल्या. प्रियंशी, मानवी, नैना आणि नीतू अशी त्यांची नावं. प्रियंशी आणि नैना पाच वर्षांच्या तर मानवी आणि नीतू सहा वर्षांच्या. झोपडीला आग लागल्याचं दिसताच स्थानिकांनी ती विझवण्यासाठी धडपड केली. बादल्यांनी पाणी टाकून त्यांनी ती आग कशीबशी विझवली. मात्र तोपर्यंत चार मुली जळाल्या होत्या.
advertisement
या आगीत तीन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. एका मुलीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी बरेलीला पाठवण्यात आलं, मात्र तिचाही रस्त्यातच मृत्यू झाला. माहिती मिळताच, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक मुलीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृत मुलांच्या पालकांना 4 लाख रुपये म्हणजे एकूण 16 लाख रुपये प्रशासनाकडून लवकरात लवकर दिले जातील, असं जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेलीमध्ये आगीमुळे झालेल्या मुलींच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे आणि शोकग्रस्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
Feb 24, 2024 8:14 AM IST
मराठी बातम्या/Viral/
झोपडीतून येत होता ओरडण्याचा आवाज; दृश्य पाहताच शेजाऱ्यांच्या अंगावर काटा, आत 4 चिमुकल्या...










