Drone Attack : ड्रोन हल्ला म्हणजे काय, हे किती मोठे असतात? भारताने पाकिस्तानचे ड्रेन हाणून पाडले, म्हणजे नक्की काय केलं?

Last Updated:

हे समजून घेणं गरजेचं आहे की ड्रोन म्हणजे काय, मुख्यता आर्मी ड्रोन काय असतात, ते कसे काम करतात, आणि त्यांचा हल्ला कशासाठी केला जातो. (what is mean by drone attack)

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : भारत पाकिस्तानमधील तणाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन दिवसांपासून दररोज पाकिस्तानकडून भारतावर ड्रोनच्या सह्याने हल्ला केला जात आहे. पण भारतीय सेना पाकिस्तानच्या या हल्ल्याला उद्धवस्त करत आहेत. पाकिस्तानचे अनेक हल्ले मागच्या दोन दिवसापासून भारतीय लष्कराने परवून लावले आहे.
पण या सगळ्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की नक्की पाकिस्तानचा ड्रोन आला (what is drone attack)  किंवा त्याला उद्धवस्त केला म्हणजे नक्की काय केलं? चला याला थोडं सोप्या शब्दात समजून घेऊ.
आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की ड्रोन म्हणजे काय, मुख्यता आर्मी ड्रोन काय असतात, ते कसे काम करतात, आणि त्यांचा हल्ला कशासाठी केला जातो. (what is mean by drone attack)
advertisement

ड्रोन म्हणजे काय? (what is drone)

ड्रोन हे एक छोटे, पायलट शिवाय म्हणजेच कोणत्याही माणासाच्या उपस्थीतीशिवाय उडणारं यंत्र आहे. तर लष्करी ड्रोन हे विमानासारखे असतात. जे दूरवरून नियंत्रित केले जातात. या ड्रोनमध्ये कॅमेरे, सेन्सर, बॉम्ब किंवा शस्त्रही बसवले जातात.

ड्रोनचे तीन मुख्य उपयोग असतात:

लक्षण ठेवणं (Surveillance): सीमांवर किंवा दुर्गम भागांमध्ये हालचालींचा मागोवा घेण्यासाठी
advertisement
हल्ला (Attack): लहान शस्त्रांनी युक्त ड्रोन थेट लक्ष्यावर हल्ला करू शकतो
सामान वाहतूक (Logistics): लष्करी किंवा नागरी ठिकाणी आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी

ड्रोन हल्ला म्हणजे काय? (what is drone attack)

जेव्हा एखाद्या देशाचा ड्रोन दुसऱ्या देशाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे घुसतो आणि टेहळणी, बॉम्ब टाकणे किंवा माहिती गोळा करतो, तेव्हा तो ड्रोन हल्ला समजला जातो. हा थेट देशाच्या सुरक्षेवर परिणाम करतो.
advertisement
म्हणजेच पाकिस्तानचा ड्रोन जर भारताच्या सीमेत प्रवेश करून कॅमेऱ्याने लष्करी हालचाली टिपत असेल किंवा शस्त्र घेऊन आलेला असेल, तर तो भारताच्या सुरक्षेला धोका ठरतो. त्यामुळे त्याला निकामी केलं जातं किंवा उडवलं जातं.

हल्ला करणारे ड्रोन किती मोठे असतात?

उदाहरणार्थ, MQ-1 प्रीडेटर ड्रोनचा आकार अंदाजे एका लहान कारसारखा आहे, तर MQ-9 रीपर एका लहान विमानासारखा आहे. RQ-4 ग्लोबल हॉक लक्षणीयरीत्या मोठा आहे, जो एका लहान व्यावसायिक विमानासारखा आहे.
advertisement

भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडला म्हणजे नक्की काय केलं?

अलीकडेच भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीर आणि पंजाब सीमारेषेजवळ अनेकदा पाकिस्तानकडून पाठवलेले ड्रोन शोधून काढले. काही ड्रोनमध्ये शस्त्र, अमली पदार्थ, बॉम्ब किंवा टेहळणीसाठी कॅमेरे होते. भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (BSF), किंवा इतर यंत्रणा या ड्रोनना वेळीच ओळखून त्यांच्यावर गोळ्या झाडतात किंवा खास अँटी-ड्रोन डिव्हाइसेस वापरून त्यांना हवेतच पाडतात.
advertisement
म्हणजेच भारताने प्रत्यक्ष त्या पाकिस्तानी ड्रोनला निष्क्रिय केलं, म्हणजेच "पाडून टाकलं".

भारताचा अँटी-ड्रोन बचाव यंत्रणा (Anti-Drone Defense System)

भारत सरकार आणि लष्कर अलीकडच्या काळात अँटी-ड्रोन तंत्रज्ञान वापरत आहे. हे रेडार आणि थर्मल सेन्सर ड्रोन ओळखतात. ड्रोनचं सिग्नल ब्लॉक करतात. तसेच हाय पॉवर लेझर किंवा शस्त्रांनी ड्रोन पाडले जातात.
शेवटी सांगायचं झालं तर...
advertisement
ड्रोन युद्धाचा नवा चेहरा बनत आहेत. भारतासारखा मोठा देश आपल्या सीमांची सुरक्षा करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. ड्रोन पाडल्याची बातमी ही केवळ तांत्रिक विजय नाही, ती आपल्या देशाच्या सुरक्षिततेची खात्री आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Drone Attack : ड्रोन हल्ला म्हणजे काय, हे किती मोठे असतात? भारताने पाकिस्तानचे ड्रेन हाणून पाडले, म्हणजे नक्की काय केलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement