74,96,89,65,000 अब्ज रुपये किंमत, जगातील सर्वात महाग पेंटिंगमधील 'मोनालिसा' कोण होती?
- Published by:Priya Lad
Last Updated:
मोनालिसा पेंटिंगबाबत अनेक रहस्य आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे मोनालिसाचं. विंचीच्या या पेंटिंगमध्ये मोनालिसाचे हास्य जितकं रहस्यमय आहे, तितकंच मोठे रहस्य म्हणजे मोनालिसा कोण होती?
नवी दिल्ली : हे पेंटिंग तुमच्यासाठी काही नवीन नाही. मोनालिसा पेटिंग, लिओनार्डो दा विंची यांनी काढलेलं हे पेंटिंग. 1500 ते 1519 च्या दरम्यान हे प्रसिद्ध पेंटिंग त्यांनी तयार केलं. अनेक शतकं फ्रान्सच्या राजांनी त्यावर कब्जा केला होता. सध्या हे पेंटिंग 1804 सालापासून पॅरिसमधील ल्यूर म्युझियममध्ये बुलेट प्रूफ ग्लासमध्ये ठेवण्यात आलं आहे.
ल्यूर म्युझियममध्ये मोनालिसाची पेंटिंग पाहण्यासाठी लोक तासन्तास रांगेत उभे असतात . मनोरंजक गोष्ट अशी आहे की ती पाहण्यासाठी फक्त 30 सेकंद मिळतात. जगातील सर्वात महागड्या पेंटिंगमध्ये मोनालिसाचा समावेश होतो. काही कला संग्रहकांनी या पेंटिंगची किंमत 900 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वर्तवली आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 74,96,89,65,000 अब्ज रुपये होते.
advertisement
मोनालिसा पेंटिंगबाबत अनेक रहस्य आहेत. त्यातील एक रहस्य म्हणजे मोनालिसाचं. विंचीच्या या पेंटिंगमध्ये मोनालिसाचे हास्य जितकं रहस्यमय आहे, तितकंच मोठे रहस्य म्हणजे मोनालिसा कोण होती?
फ्रेंच व्यापाऱ्याची पत्नी की लिओनार्डोची आई?
बऱ्याच इतिहासकारांचा असा दावा आहे की मोनालिसा ही फ्रेंच व्यापारी फ्रान्सिस्को डी बार्टोलोमेओ डेल जियोकोंडोची पत्नी लिसा डेल जिओकोंडो होती. विंचीचं चरित्र लिहिणाऱ्या ज्योर्जिओ वसारी यांनीही 1550 साली आपल्या पुस्तकात हेच सांगितलं होतं. पण काही इतिहासकारांचं मत वेगळं आहे. त्यांचा असा विश्वास आहे की मोनालिसा ही खरोखर लिओनार्डो दा विंचीची आई कॅटरिना होती. विंचीने त्याच्या चित्रांमध्ये त्याच्या आईचे चित्रण केलं आहे.
advertisement
विंचीच मोनालिसा?
कलेवर काम करणारे जगातील काही तज्ज्ञ या दोघांपेक्षा वेगळा सिद्धांत देतात. मोनालिसामध्ये लिओनार्डो दा विंचीने स्वत:ची व्यक्तिरेखा साकारली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, लिओनार्डो स्वतःला एक स्त्री म्हणून पाहत होते, त्यांची कल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोनालिसा रेखाटली.
advertisement
पण मोनालिसा नेमकी कोण होती याबाबत आजपर्यंत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
Location :
Delhi
First Published :
May 20, 2024 9:45 AM IST
मराठी बातम्या/Viral/
74,96,89,65,000 अब्ज रुपये किंमत, जगातील सर्वात महाग पेंटिंगमधील 'मोनालिसा' कोण होती?