Mystrrious People : जगातील ते 10 रहस्यमय लोक, ज्यांची ओळख आजपर्यंत नाही पटली, PHOTOS
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
Mystrrious People : अशा काही घटना घडतात ज्याची जगभरात चर्चा होते. ते फोटो जगभरात व्हायरल होतात, पण त्या फोटोंमध्ये दिसणारे लोक नेहमी कोण होते ते आजवर कधीच कळू शकलं नाही. या फोटोतील लोक म्हणजे अशी कोडी होती जी कधीच सुटली नाहीत.
advertisement
द फॉलिंग मॅन: 9/11 मध्ये अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यावेळी एक व्यक्ती खाली डोकं वर पाय अशा स्थितीत खाली पडत असल्याचं कॅमेऱ्यांमध्ये कैद झालं होतं. या व्यक्तीचा फोटो जगभरात पोहोचला पण या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. काही लोकांच्या मते, या व्यक्तीचे नाव जोनाथन ब्रायले होतं, जो रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. पण आजवर या गोष्टीची पुष्टी झाली नाही.
advertisement
द हिरोशिमा स्टेप्स शॅडो: दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर हल्ला झाला तेव्हा एका झटक्यात तीन लाख लोक मरण पावले होते. हा फोटो स्फोटाच्या ठिकाणापासून 850 फूट अंतरावर घेण्यात आला होता. याठिकाणी एक व्यक्ती बसली होती, परंतु अणुबॉम्बच्या शक्तीने तिला नष्ट केलं, पण तिची सावली मात्र तशीच राहिली. या सावलीचं सत्य काय ते आजवर कधीच कळलं नाही.
advertisement
सीन नदीत मृतावस्थेत सापडलेली हसऱ्या चेहऱ्याची मुलगी: या मुलीची ओळख कधीच पटली नाही. ही कोण होती, जिच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती नव्हती आणि जिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. लोकांनी या मुलीचे फोटो विकत घेतले होते. हा फोटो सर्वाधिक 'किस' घेतलेल्या फोटोंपैकी एक आहे. या मुलीच्या चेहऱ्याच्या फोटोवरून एक मूर्ती तयार करण्यात आली होती, या मूर्तीचं हास्य अगदी त्या मुलीसारखं होतं.
advertisement
केविन कार्टरच्या फोटोतील ते मूल : सुदानच्या दौऱ्यावर गेलेले फोटो जर्नलिस्ट केविन कार्टर यांच्या या फोटोची जगभरात चर्चा झाली होती. या फोटोत मृत्यूच्या दारात असलेला मुलगा होता. या फोटोत मुलाच्या मागे बसलेले गिधाड त्याच्या मृत्यूची वाट पाहत असल्याचं दिसत होतं. पण हा मुलगा कोण होता, हे कळू शकलं नाही.
advertisement
माउंट एव्हरेस्टवर सापडले अनोळखी लोकांचे मृतदेह : 'ग्रीन बूट' घातलेल्या या मृतदेहाची कधीच ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह एव्हरेस्टवर चढण्यासाठी निघालेल्या व्यक्तीचा होता. एव्हरेस्टवर चढाई 1922 मध्ये सुरू झाली होती, परंतु एडमंड हिलेरी आणि तेनझिंग दोघेही पहिल्यांदा 29 मे 1953 रोजी नॉर्व्हेला पोहोचले होते, पण त्यांच्याआधी प्रयत्न केलेल्या 200 लोकांचा मृत्यू झाला होता. यापैकी अनेकांची अद्याप ओळख पटलेली नाही.
advertisement
advertisement
डी.बी. कूपर: ही व्यक्ती अमेरिकन हवाई दलाच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची व्यक्ती आहे, जिची ओळख कधीच पटू शकली नाही. त्याने एक अमेरिकन विमान हवेत हायजॅक केलं आणि विमान कुठेही उतरण्यापूर्वी दोन लाख अमेरिकन डॉलर्स घेऊन पॅराशूटसह विमानातून उडी मारली. लाखो प्रयत्न करूनही अमेरिकन एजन्सी त्याला पकडू शकल्या नाहीत. बरीच शोधाशोध केल्यानंतर चार वर्षांनंतर कोलंबिया नदीत काही पैसे सापडले पण उर्वरित पैसे व पॅराशूटसह कूपर पोलिसांना सापडला नाही.
advertisement
विक्ट्री डे ला किस करणारं अनोळखी कपल: दुसरं महायुद्ध संपल्याचा आनंद न्यूयॉर्कमध्ये साजरा केला जात होता, तेव्हा हा फोटो अल्फ्रेड एसेनस्टेडने काढला होता. हा फोटो आनंदाचा 'आयकॉन' मानला गेला आणि या जोडप्याचा शोध घेण्यात आला. पण हे जोडपं कधीच समोर आलं नाही. ज्या लोकांनी आपण ते जोडपं असल्याचा दावा केला ते चुकीचे होते. खऱ्या 'आयकॉन'चा शोध कधीच पूर्ण झाला नाही. मात्र, आता एक-दोन वर्षांपूर्वी या फोटोत दिसणाऱ्या दोघांची ओळख पटली असं म्हटलं गेलं. तो पुरुष खलाशी होता आणि स्त्री नर्स होती.
advertisement
द बबुश्का लेडी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्येच्या वेळी एक महिला दिसली होती, जी अनेक लोकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. केनेडींची हत्या त्यांच्या हातात असलेल्या कॅमेऱ्याच्या रुपातील पिस्तूलने झाली होती, असं म्हणतात. परंतु त्या महिलेची कधीही ओळख पटू शकली नाही किंवा कॅमेरा अथवा त्या पिस्तूलची कोणतीही माहिती सापडली नाही. नंतर एका महिलेने दावा केला होता की तिथे होती, पण ती ते सिद्ध करू शकली नाही, त्यामुळे केनेडींची हत्या फक्त एकाच व्यक्तीने केली होती, की इतरही कोणी होतं, हे गूढ आजपर्यंत कायम आहे. जर मारणारं दुसरं कुणीतरी होतं तर ही महिला तिथे कशी पोहोचली आणि अद्याप तिची ओळख का पटली नाही? हे अनुत्तरीत आहे.
advertisement
त्यानआनमेन चौकात रणगाड्यासमोर उभी असलेली व्यक्ती: चीनमध्ये 3-4 जून 1989 रोजी त्यानआनमेन चौकात चिनी सैन्याने विद्यार्थ्यांवर केलेल्या दडपशाहीच्या वेळी काढलेल्या या फोटोत रणगाड्यासमोर उभी असलेली व्यक्ती कोण होती, याची ओळख आजवर पटलेली नाही. हा माणूस किमान दोनदा सैन्याच्या रणगाड्यासमोर आला आणि मग जमावाने त्याला आपल्याकडे ओढलं. रणगाडा चालवणाऱ्याशी तो बोलला होता पण त्याचा चेहरा कुणीच पाहू शकलं नाही. नंतर हा फोटो चीनच्या विरोधाचा प्रतीक बनला पण या रहस्यमयी व्यक्तीची ओळख पटली नाही.