हॉटेलपेक्षा रस्त्यावरचे पदार्थ टेस्टी का लागतात? प्रसिद्ध भारतीय शेफनं सांगितले 2 मोठे सिक्रेट

Last Updated:

हॉटेलमध्ये आपण या पदार्थांसाठी बरीच किंमत मोजतो. रस्त्यावर हे पदार्थ अगदी काही रुपयात मिळतात. अगदी कुणालाही परवडतील या किमतीत. मग हॉटेलपेक्षा हे पदार्थ चविष्ट कसे काय लागतात?

हॉटेलपेक्षा स्ट्रिट फूड टेस्टी कस?
हॉटेलपेक्षा स्ट्रिट फूड टेस्टी कस?
नवी दिल्ली : अनेकांना घरातील पदार्थांपेक्षा बाहेरचे पदार्थ खायला आवडतात. काहींना हॉटेलमध्ये बसून खायला आवडतं. तर काहींना स्ट्रिट फूड. तुम्ही हॉटेलमधील पदार्थ आणि स्ट्रीट फूड असं दोन्ही खाल्लं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हॉटेलपेक्षाही भारी चव असते ती रस्त्यावरच्या पदार्थांना. यामागील कारण एका प्रसिद्ध शेफनं सांगितली आहे.
इडली-डोला, वडापाव-समोसा, पावभाजी-मिसळपाव, पाणीपुरी-रगडापुरी, असे काही पदार्थ हॉटेलपेक्षा रस्त्यावर खाण्यात जास्त मजा येते. ते चविष्टही लागतात. हॉटेलमध्ये आपण या पदार्थांसाठी बरीच किंमत मोजतो. रस्त्यावर हे पदार्थ अगदी काही रुपयात मिळतात. अगदी कुणालाही परवडतील या किमतीत. मग हॉटेलपेक्षा हे पदार्थ चविष्ट कसे काय लागतात?
advertisement
भारतातील प्रसिद्ध शेफनं यामागील कारणं सांगितलं आहेत. याची दोन कारणं आहेत.  एक म्हणजे फ्रिज आणि दुसरं म्हणजे बजेट
फ्रिज आणि बजेटचा कसा होतो परिणाम
फ्रिज : रस्त्यावरील खाद्यविक्रेते फ्रीज वापरत नाहीत. ते तेच पदार्थ बनवतात जे ताजे बनवून विकता येतात. ग्राहक आला की त्याला ते पदार्थ बनवून देतात आधीपासून बनवून ठेवत नाहीत. जर काही शिल्लक राहिलं तर ते गरजूंना वाटून टाकतात तसंच ठेवत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजे पदार्थ बनवून ग्राहकांना खायला घालतात.
advertisement
या उलट हॉटेलमध्ये एका मोठमोठे फ्रीज असतात. ज्यात कित्येक दिवस पदार्थ साठवून ठेवलेले असतात. आठवडा आठवडा हे पदार्थ फ्रिजमध्ये असतात जे वापरले जातात.
बजेट : हॉटेलवाल्यांना खूप पैसा मिळतो. त्यामुळे तशा किमतीचे पदार्थ बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एका पदार्थामध्ये ते बरीच सामग्री टाकतात. पण जितक्या कमी सामग्रीत पदार्थ बनेल तितका तो चांगला आणि चविष्ट. रस्त्यावरील विक्रेत्यांकडे इतकं बजेट नसतं. त्यामुळे मोजक्याच सामग्रीत ते पदार्थ बनवतात आणि ते म्हणून ते टेस्टी लागतात.
advertisement
प्रसिद्ध शेफ रणवीर बरार यांनी ही माहिती दिली आहे. fizzyfoodie196 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
हॉटेलपेक्षा रस्त्यावरचे पदार्थ टेस्टी का लागतात? प्रसिद्ध भारतीय शेफनं सांगितले 2 मोठे सिक्रेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement