डॉगी, डॉगी करत कुत्र्यांच्या मागे पळाली आणि मृत्यूच्या दारात पोहोचली, महिलेसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman died with 2 pet in fire : महिलेने श्वानांना टेरेसवर जायला सांगितलं. पण तिचे श्वान तिला खाली खेचू लागले. त्यांनी तिला ओढत खाली नेलं. श्वान खालच्या दिशेने पळाल्याने महिलाबी त्यांच्या मागे मागे पळाली.
मुंबई : किती तरी लोक आहे जे कुत्रे पाळतात. हे श्वान म्हणजे त्यांच्यासाठी मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांना काय हवं नको ते सगळं त्यांना देतात, त्यांना जे आवडतं ते करतात. कित्येक श्वानप्रेमींना तुम्ही सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर गार्डनमध्ये फिरताना पाहिलं असेल, मालकांना श्वानांच्या मागे पळताना पाहिलं असेल. अशीच एक महिला जी आपल्या श्वानांच्या मागे मागे पळत गेली आणि मृत्यूच्या दारात पोहोचली.
अंधेरीतील लोखंडवालामधील ही घटना आहे. इथल्या ब्रुकलिंक हाऊसिंग सोसायटी इमारतीत शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अभिना संजनवाला असं या महिलेचं नाव आहे. तिच्यासोबत तिच्या दोन पाळीव श्वानांचाही मृत्यू झाला आहे.
advertisement
माहितीनुसार अभिना तिचा नवरा कार्तिक आणि दोन श्वानांसह बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर राहत होती. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. तेव्हा अभिना आपल्या दोन्ही श्वानांना घेऊन टेरेसच्या दिशेने जात होती. तिने श्वानांना टेरेसवर जायला सांगितलं. पण तिचे श्वान तिला खाली खेचू लागले. त्यांनी तिला ओढत खाली नेलं. श्वान खालच्या दिशेने पळाल्याने अभिनाही त्यांच्या मागे मागे पळाली.
advertisement
पहिल्या मजल्यावर आग लागलेली असल्याने धूर पसरला होता. खाली येताच या धुरात अभिना आणि तिचे दोन्ही श्वान गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी सांगितलं की, अभिनाने श्वानांना टेरेसवर जायला सांगितलं. पण तिच्या श्वानांनी तिला खाली ओढत आणलं असावं. तिच्याकडे ज्या कुत्र्यांची प्रजाती होती ती सतत पुढेच पळणारी होती. संध्याकाळीसुद्धा जेव्हा ती त्यांना फिरायला बाहेर न्यायची तेव्हा ते पुढे पळायचे. तिला ओढत न्यायचे.
advertisement
दरम्यान अभिनाचा नवरा कार्तिकसह इतर 6 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने आग फक्त पहिल्याच मजल्यावर राहिली ती पसरली नाही. पण धुराचे लोट सगळीकडे पसरले होते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होती. बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 27, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/Viral/
डॉगी, डॉगी करत कुत्र्यांच्या मागे पळाली आणि मृत्यूच्या दारात पोहोचली, महिलेसोबत नेमकं काय घडलं?