प्रेम पाहिजे तर 'या' हॉटेलमध्ये जा... 4,700 रुपयात मिळेल जोडीदार जो तुमचा एकटेपणा करेल कमी, कुठे आहे असं ठिकाण?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हॉटेल मॅनेजर मिस्टर डोंग यांच्या मते, जुलै महिन्यात सुरू झालेल्या या सेवेला काही आठवड्यांतच 300 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या आहेत.
मुंबई : आजकाल लोक पाळीव प्राण्यांना फक्त सोबती म्हणून नाही, तर कुटुंबाचा भाग मानतात. कॅफेपासून योगा सेशन्स, ग्रूमिंग, अगदी पाळीव प्राण्यांच्या क्लोनिंगपर्यंत नवनवीन ट्रेंड्स आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत. आता या ट्रेंडमध्ये हॉटेल्सही सामील झाली आहेत.
यातच एका हॉटेलने अनोखी सेवा सुरू केली आहे. ज्यामुळे हे हॉटेल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं. येथे पाहुण्यांना फक्त राहण्यासाठी खोली मिळत नाही, तर त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी एक गोंडस कुत्राही दिला जातो. साधारण 4,700 रुपयांच्या खर्चात ते गोल्डन रिट्रिव्हर, हस्की किंवा वेस्ट हायलंड टेरियर सारख्या कुत्र्यांना रूम पार्टनर म्हणून घेऊ शकतात. त्यामुळे ना कंटाळा येतो, न एकटेपणा जाणवतो ज्यामुळे लोकांचा वेळ देखील चांगल्या सहवासात जातो.
advertisement
हॉटेल मॅनेजर मिस्टर डोंग यांच्या मते, जुलै महिन्यात सुरू झालेल्या या सेवेला काही आठवड्यांतच 300 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या आहेत. पाहुण्यांना ही तिथे येणाऱ्या लोकांना ही कल्पना आवडते कारण त्यांना यातून भावनिक जोड आणि उबदार अनुभव मिळतो.
ही सेवा चीनच्या वेगाने वाढणाऱ्या पाळीव प्राणी अर्थव्यवस्थेचा (Pet Economy) एक भाग आहे. 2024 मध्ये ती 300 अब्ज युआनपर्यंत पोहोचली आहे तर 2027 पर्यंत 400 अब्ज युआनपर्यंत ती जाण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या हॉटेलमध्ये 10 प्रशिक्षित कुत्रे आहेत जे पाहुण्यांना आनंददायी अनुभव देतात. एका पाहुण्याने सांगितले, “मला वाटले होते की पप्पी खूप खोडकर असेल, पण तो शांत आणि आज्ञाधारक निघाला.” या हॉटेलमधील काही कुत्रे हॉटेलचे स्वतःचे आहेत, तर काही प्रशिक्षक किंवा खाजगी मालकांकडून आणले जातात. सर्व कुत्र्यांचे आरोग्य परीक्षण आणि ट्रेनिंग केली जाते, जेणेकरून येणारे गेस्ट आणि प्राणी दोघांचाही अनुभव सुखद राहील.
advertisement
14 महिन्यांचा समोयड ‘नैचा’ या कुत्र्याची मालकीण मिस फांग सांगतात की, “नैचा आता आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. स्टाफ त्याचे व्हिडिओ मला पाठवतो ज्यात तो पाहुण्यांसोबत खेळताना दिसतो.” तथापि, अशा प्रकारच्या सेवांबाबत कायदेशीर बाबींवर चीनमध्ये चर्चा सुरू आहे.
थोडक्यात, वुहानमधील या हॉटेलने ‘ह्यूमन-डॉगी फ्रेंडशिप’ एका नव्या पातळीवर नेली आहे आणि पाळीव प्राण्यांशी संबंधित उद्योग किती वेगाने वाढतो आहे याचे हे ठोस उदाहरण आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 10:09 PM IST
मराठी बातम्या/Viral/
प्रेम पाहिजे तर 'या' हॉटेलमध्ये जा... 4,700 रुपयात मिळेल जोडीदार जो तुमचा एकटेपणा करेल कमी, कुठे आहे असं ठिकाण?


